नक्षलवादी पळून गेले
गडचिरोली – तेंदूपत्ता कंत्राटदारांची बैठक बोलावून पैसे उकळण्याचा नक्षलवाद्यांचा डाव उधळून लावत सैनिकांनी त्यांचा तळ उद्ध्वस्त केला. या वेळी घातक स्फोटके घटनास्थळीच नष्ट केली. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले. छत्तीसगड सीमेवरील सावरगावजवळील घनदाट जंगलात ५ जूनला सायंकाळी ही घटना घडली. पोलिसांनी सी- ६० सैनिकांसह नक्षलविरोधी अभियान राबवले होते. घनदाट जंगल आणि अंधार असल्याने नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी झाले.
संपादकीय भूमिकानक्षलवादाची समस्या समूळ नष्ट होईपर्यंत सरकारने ठोस पावले उचलावीत ! |