बारामुला (जम्मू-काश्मीर) – येथील गुलमर्गमध्ये १०० वर्षांहून अधिक जुन्या असणार्या श्री शिवमंदिराला ६ जूनला पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास आग लागली. यामुळे मंदिराची मोठी हानी झाली आहे. आगीमागील कारण अद्याप स्ष्ट झालेले नाही. वर्ष १९१५ मध्ये महाराजा हरिसिंह यांच्या पत्नी मोहिनीबाई सिसोदिया यांनी हे मंदिर बांधले होते. या मंदिराच्या ठिकाणी वर्ष १९७४ मध्ये अभिनेते राजेश खन्ना आणि अभिनेत्री मुमताज यांच्या ‘आप की कसम’ या चित्रपटातील ‘जय जय शिव शंकर…’ या गाण्याचे चित्रीकरण झाले होते.