समाजाच्या प्रोत्साहनाने दिव्यांग (विकलांग) देशासाठी मोठे योगदान देतील ! – दत्तात्रय होसबाळे, सरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वोच्च सेवा करणे ही सार्थकता !

पुणे येथे ‘सक्षम’च्या दोन दिवसांच्या अधिवेशनाचे उद्घाटन

– प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

अनेक दिव्यांगांनी (विकलांगांनी) त्यांच्या कामगिरीने समाजाला प्रेरणा देत इतिहास रचला आहे. मनोबल हे मानवाचे सर्वोच्च बळ आहे. सर्व अवयव सुस्थितीत असूनही ज्याच्याकडे मनोबल (विकलांग) नाही, तो दुर्बळ बनतो आणि ज्यांच्याकडे प्रखर मनोबल आहे, ते दिव्यांग (विकलांग) असूनही सक्षम असतो. ज्याने आत्मविश्वास गमावला, त्याने सारे गमावले. अंतःकरणात कोणतीही दुर्बलता ठेवू नका, आत्मविश्वास सतत जागृत ठेवा. सर्वोच्च सेवा करणे, ही सार्थकता असून अंत:करण शुद्धीने भारतमातेप्रती समर्पणभाव कायम ठेवा.

‘सक्षम’च्या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करतांना दत्तात्रय होसबाळे

पुणे – प्रत्येकात न्यूनता असते. आपण सर्व जण अपूर्ण आहोत. ही न्यूनता परिपूर्णतेच्या दिशेने जाण्यासाठी ईश्वराने समाज म्हणून आपल्याला दिव्यांगांचा (विकलांगांचा) स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी सेवेची संधी दिली आहे. समाजाने दिव्यांग व्यक्तीमध्ये काय नाही ? यापेक्षा काय आहे ? याचा विचार करून त्यांना प्रोत्साहन दिल्यास ते देशासाठी मोठे योगदान देऊ शकतील, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले.

समदृष्टी, क्षमताविकास आणि संशोधन मंडळ (‘सक्षम’) या दिव्यांगांच्या (विकलांगांच्या) सक्षमीकरणासाठी वाहिलेल्या राष्ट्रीय संस्थेच्या त्रैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पुण्यातील ‘महर्षी कर्वे संस्थे’त दोन दिवस हे अधिवेशन चालू रहाणार आहे. या प्रसंगी अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे  कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी विविध अतिथींचे सत्कार करण्यात आले. कमलाकांत पांडे यांनी प्रास्तविक केले. स्वागत समितीचे अध्यक्ष अधिवक्ता एस्.के. जैन यांनी स्वागत केले. ‘सक्षम’चे नूतन महामंत्री उमेश अंधारे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष डॉ. मुरलीधर कचरे यांनी आभार मानले. या अधिवेशनाला देशभरातून ५०० जिल्ह्यांतील १ सहस्र ५०० प्रतिनिधी उपस्थित आहेत.