Chinese national Arrested : भारतात घुसलेल्या चिनी नागरिकाला अटक !

मुझफ्फरपूर (बिहार) – व्हिसाविना नेपाळमार्गे भारतात घुसलेल्या ली जियाकी या चिनी नागरिकाला बिहारच्या मुझफ्फरपूर पोलिसांनी नुकतीच अटक केली. भारतात बेकायदेशीररित्या भारतात घुसखोरी करण्याच्या कलमाखाली त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चीनचे पारपत्र, भ्रमणभाष, चिनी चलनाच्या नोटा, चीनचा नकाशा आदी जप्त करण्यात आले. पोलिसांनी त्याला न्यायालयात उपस्थित केले असता त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली. विदेशी नागरिकाच्या अटकेनंतर गुप्तचर यंत्रणांसह अनेक अन्वेषण यंत्रणांचे अधिकारी या प्रकरणी पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका 

पाकिस्तानी आणि बांगलादेशी यांच्यानंतर आता चिनी नागरिकांचीही भारतात घुसखोरी होत असेल, तर ते सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे, हे लक्षात घ्या !