सायबर गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्रात कार्यरत होणार ८३७ कोटी रुपयांचा पहिला ‘सायबर सुरक्षा’ प्रकल्प !

मुंबई, १० जून (वार्ता.) – सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात ८३७ कोटी ८६ लाख रुपयांचा महत्त्वांकाक्षी ‘सायबर सुरक्षा’ प्रकल्प कार्यरत होणार आहे. यामध्ये साहित्याच्या खरेदीसाठी ‘एल् अँड टी. टेक्नॉलॉजी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘केपीएम्जी इंडिया एल्.एल्.पी.’ या आस्थापनांना राज्यशासनाकडून २४ कोटी ५३ लाख २० रुपये निधी देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात वाढत्या सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांच्या विरोधात तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्याच्या गृहविभागातील विविध तंत्रज्ञान विकास प्रकल्पांच्या अंतर्गत हा सायबर सुरक्षा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती यापूर्वी विधानसभेत दिली होती. या प्रकल्पामध्ये अनुमाने ८३७ कोटी ८६ लाख इतका खर्च हा ५ वर्ष ५ मासांसाठीचा आहे. यामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांद्वारे हा प्रकल्प राबवला जाणार आहे.