तथाकथित पुरोगामी यांच्या दांभिक प्रसारामुळे खरा इतिहास दडपला जात आहे ! – किरण नाकती, शिवसेना उपविभागप्रमुख, ठाणे

अनेक गड-दुर्ग यांवर धर्मांधांनी थडगी अथवा मजार बांधून ताबा मिळवला आहे. गड-दुर्ग यांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी आपण कृतिशील व्हायला हवे.

कोविड केंद्राच्या निविदेत भ्रष्टाचार ! – किरीट सोमय्या, भाजप खासदार

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या जिवाशी खेळण्याचे काम आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी केले आहे. पैशासाठी त्यांनी मुंबई आणि पुणे येथील नागरिकांचा जीव धोक्यात घातला आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात २५० कोटी रुपयांचा औषध खरेदी घोटाळा ! – शैलेंद्र वेलींगकर, शिवसेना

केवळ १३१ रुपये किमतीच्या प्रति इंजेक्शनची २ सहस्र रुपये प्रति इंजेक्शनप्रमाणे एकूण १०० इंजेक्शनची खरेदी करण्यात आली.

मृत्यूनंतर माझा दफनविधी औरंगाबाद येथे करा ! – असदुद्दीन ओवैसी, खासदार, एम्.आय.एम्.

‘मृत्यूनंतर माझा दफनविधी संभाजीनगर येथे करा,’ असा पुनरुच्चार एम्.आय.एम्. पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी नुकताच येथे केला आहे. मुसलमान पंथात जिल्ह्यातील खुलताबाद हे शहर पवित्र मानले जाते.

भांबराजा (यवतमाळ) येथील शिवसेनेचे माजी सरपंच सुनील डिवरे यांची हत्या !

शहरापासून जवळच असलेल्या भांबराजा येथील शिवसेनेचे माजी सरपंच, तसेच यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील डिवरे यांच्यावर ३ फेब्रुवारी या दिवशी गोळ्या झाडून नंतर कुर्‍हाडीने वार करून  त्यांची हत्या करण्यात आली.

मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाविषयी लवकरच सकारात्मक निर्णय घेणार !- अर्जुनराम मेघवाल, केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री

मराठी भाषा आणि या दर्जेदार साहित्याचा निश्चित अभिमान आहे. या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी केंद्र सरकारही प्रयत्नशील आहे. त्यानुसार लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येणार आहे,.

संजय राऊत यांच्या निकटवर्तियाला ईडीकडून अटक !

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गोरेगावमधील पत्रा चाळ भूमी घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक केली आहे.

संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरून राजकारण !

१० फेब्रुवारीला पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे नियोजन महापालिका करत आहे, तर पुतळ्याचे उद्घाटन छत्रपती शिवरायांच्या वंशजांच्या हस्ते १९ फेब्रुवारी या दिवशी केले जावे, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे.

खासदार संजय राऊत आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या विरोधात अवमान याचिका प्रविष्ट करणार ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

भाजप आमदारांचे केलेले निलंबन घटनाबाह्य ! सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्याय दिला असून आमदार म्हणून कर्तव्य बजावण्याचा अधिकार त्यांना बहाल केला आहे.

नाशिक येथे प्रचारासाठी गेलेले शिवसेनेचे नगरसेवक चंद्रकांत खाडे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार !

आश्वासन देऊनही साडेचार वर्षांत दवाखान्याची निर्मिती न केल्यामुळे नागरिक संतप्त !