राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निवडणूक शपथपत्रातील माहितीत तफावत आढळल्याने न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश !

शिवसेनेचे आमदार तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांच्या निवडणूक शपथपत्रातील माहितीमध्ये तफावत आढळल्याने सिल्लोड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी याची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना १६ फेब्रुवारी या दिवशी दिले आहेत.

ईडीचा सर्वांत मोठा घोटाळा उघड करणार ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

पुढील आठवड्यात अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) सर्वात मोठा घोटाळा उघड करणार आहे, अशी चेतावणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

शिवसेना नेत्याविरोधात पुणे येथे बलात्कार आणि गर्भपाताचा गुन्हा नोंद !

असे वासनांध राजकारणी जनतेसमोर काय आदर्श ठेवणार ? अशा नेत्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी.

ज्येष्ठ शिवसैनिक सुधीर जोशी यांचे निधन !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी राहिलेले ज्येष्ठ शिवसैनिक सुधीर जोशी यांचे १७ फेब्रुवारी या दिवशी ८१ व्या वर्षी जसलोक रुग्णालयात निधन झाले. मागील काही वर्षांपासून ते आजारी होते.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांना न्यायालयीन कोठडी

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील आक्रमण – पोलिसांनी त्यांना येथील न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने सावंत यांना २ दिवसांची पोलीस कोठडी बजावली होती. त्याचा कालावधी संपल्याने पोलिसांनी सावंत यांना येथील न्यायालयात उपस्थित केले.

संजय राऊत यांनी स्वतःवरील कारवाईविषयी उत्तर द्यावे ! – नारायण राणे, केंद्रीय मंत्री

संजय राऊत शिवसेना वाढवत नाही. ते शिवसेनेचे नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यांना सुपारी मिळाली आहे.

‘ईडी’च्या चौकशीला घाबरून नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ! – विनायक राऊत, खासदार, शिवसेना

नारायण राणे यांची पंतप्रधान मोदी यांवरील टीका आणि किरीट सोमय्या यांचे राणे यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप यांविषयीचे व्हिडिओ केले पत्रकार परिषदेत सादर ! 

महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

राऊत यांच्याकडून भाजपच्या विविध नेत्यांवर आरोप

राज्यात केवळ दिनांकानुसारच शिवजयंती साजरी व्हावी यासाठी शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करणार !

राज्यात अनेक वर्षांपासून १९ फेब्रुवारी या दिवशी दिनांकानुसार आणि दुसर्‍यांदा तिथीनुसार शिवजयंतीचा सोहळा साजरा होतो. २ वेळा शिवजयंती साजरी करण्याविषयी अनेक पक्ष आणि संघटना यांची मतमतांतरे आहेत.

भाजपच्या शहराध्यक्षांसह ४०० कार्यकर्त्यांवर पुणे येथे गुन्हा नोंद !

पुणे महापालिकेत किरीट सोमय्या आले असतांना झालेल्या गोंधळाच्या प्रकरणी पुणे पोलिसांकडून भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, बापू मानकर यांच्यासह ३५० ते ४०० कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.