केंद्र सरकारने वाढवलेले रासायनिक खतांचे दर अल्प करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा ! – शिवसेनेचे कागल तहसीलदारांना निवेदन

ल्हापूर जिल्ह्यासाठी रब्बी हंगामासाठी १ लाख ७५ सहस्र टन, तर खरीप हंगामासाठी १ लाख ४२ सहस्र टन इतके रासायनिक खत शेतकर्‍यांना लागते. अगोदरच पिकवलेल्या शेतीमालाला दर नाही, अशी स्थिती आहे.

नाट्यगृह चालवू शकत नसाल, तर आयुक्तांनी आसंदी खाली करावी ! – मनसेची मागणी

मनसेचे शहराध्यक्ष म्हणाले की, संत एकनाथ रंगमंदिराचे खासगीकरण करण्याचा निर्णय फक्त शिवसेनेच्या दबावाखाली घेण्यात आला आहे. महापालिका अत्यंत उत्तमरितीने हे नाट्यगृह कसे चालवू शकते, याचे नियोजनही आम्ही सूचवले आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे यांची पोलिसांकडून चौकशी

परब यांच्यावरील आक्रमणाच्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी राणे यांनी प्रथम जिल्हा न्यायालयात आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात अर्ज प्रविष्ट केला होता. या दोन्ही ठिकाणी राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. उच्च न्यायालयाने त्यांना २७ जानेवारीपर्यंत अटक करू नये’, असा आदेश दिला.

नांदेड येथे भूमी विकून शिवसैनिकाने बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर उभे केले !

शिवसैनिक संजय इटग्याळकर यांनी १ एकर परिसरात हे मंदिर उभे केले आहे. याठिकाणी विनामूल्य कराटे प्रशिक्षण केंद्र, व्यायामशाळा आणि सांस्कृतिक सभागृह उभारून या परिसरातील तरुणांना त्याचा लाभ मिळावा हा त्यांचा मानस आहे.

तलवार आजही आमच्या हातात आहे हे लक्षात ठेवा !

हिंदूंनो, राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला होणारा विरोध हा हिंदूंच्या शौर्याला विरोध आहे, हे लक्षात घ्या !

गांधीनगर बाजारपेठेतील सर्व दुकानांचे नामफलक मराठीत करावेत ! – राजू यादव, करवीर तालुकाप्रमुख, शिवसेना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व व्यावसायिक यांच्या आस्थापनांचे फलक मराठीत असावेत, असा निर्णय घेतला आहे. मराठीपणा जपण्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे.

मराठी भाषिकांवरील राजद्रोहाचे खटले मागे घ्यावेत या मागणीसाठी २२ जानेवारीला आंदोलन ! – शिवसेना

‘‘कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा अवमान झाल्यावर याचा निषेध नोंदवण्यासाठी बेळगावमध्ये आंदोलन करणार्‍या ६१ मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारने राजद्रोहाचे गुन्हे नोंद केले आहेत. तरी हे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत.

पानिपत मराठा शौर्यदिनी हुतात्मा मावळ्यांना शिवसेनेच्या वतीने अभिवादन !

१४ जानेवारी १७६१ हा दिवस मराठा साम्राज्यासाठी शौर्यगाथा मांडणारा दिवस आहे. इतिहासात नोंदवलेल्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव जरी झाला असला, तरी मराठ्यांचे सामर्थ्य, धाडस आणि शौर्य यांचे दर्शन या दिवशी झाले.

हिंगोली येथे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा !

काँग्रेसप्रमाणे शिवसेनेने मुसलमानांचे लांगूलचालन करू नये, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

भिंगार (जिल्हा नगर) येथे हनुमान चालिसा लावल्याने धर्मांधांकडून हिंदु कुटुंबाला मारहाण !

हिंदूंनो, आणखी किती काळ धर्मांधांकडून मार खाणार आहात ? आतातरी त्यांना धडा शिकवा !