जगाला तारण्यासाठी आज हिंदुत्वाची खरी आवश्यकता आहे ! – पू. भिडेगुरुजी

श्री दुर्गामात दौडीत सहभागी धारकरी

सांगली, ९ ऑक्टोबर (वार्ता.) –  संपूर्ण जगाला तारण्यासाठी आज खर्‍या अर्थाने हिंदुत्वाची अर्थात् हिंदु धर्माचीच खरी आवश्यकता आहे. सध्याच्या काळात भारताला लागलेली म्लेंच्छबाधा घालवण्यासाठी समस्त हिंदूंचा रक्तगट पालटणे हेच श्री दुर्गादौडीचे ध्येय आहे. छत्रपती आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श हिंदूंच्या नसानसांत भिनवून हिंदुस्थानचे पुनरुत्थान घडवूया, असे मार्गदर्शन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी येथे केले. ८ ऑक्टोबर या दिवशी श्री दुर्गादौडीच्या वेळी धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

पू. भिडेगुरुजी म्हणाले की, छत्रपती शिवराय यांचे समकालीन जगद्गुरु संत तुकाराम महाराज भजन कीर्तन करत असतांना त्या काळातील नतद्रष्टांनी परस्त्रीला पाचारण करून त्यांना भ्रष्ट करण्याचे षड्यंत्र रचले होते; परंतु भ्रष्ट करण्यासाठी आलेल्या चारित्र्यहीन स्त्रीसमोरही जगद्गुरु संत तुकाराम महाराज ‘परस्त्री मातेसमान’ या हिंदु धर्माच्या शिकवणीनुसार नतमस्तक झाले. छत्रपती शिवरायांनीही परधर्मीय स्त्रीचा मातेसमान सन्मान करून तिची पाठवण केली.