गुरुद्वारा भारतप्रेमी आणि खलिस्तानविरोधी असल्याने घडली घटना
व्हँकुव्हर (कॅनडा) – येथील ‘खालसा दिवाण सोसायटी’च्या गुरुद्वाराच्या भिंतीवर खलिस्तान समर्थक आणि भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या. या गुरुद्वाराला ‘रॉस स्ट्रीट गुरुद्वारा’ म्हणून ओळखले जाते. व्हँकुव्हर पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत.
Anti-India slogans sprayed on a Gurdwara in Vancouver (Canada) by Khalistani extremists!
The reason? The Gurdwara stood for India and opposed Khalistan.
Just like j!h@di terrorists bomb mosques during namaz and kill their own, Khalistanis now seem to be walking the same path —… pic.twitter.com/yBi44pMbmn
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 20, 2025
या घटनेनंतर गुरुद्वारा समितीने प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खलिस्तानचा पुरस्कार करणार्या खलिस्तानवाद्यांच्या एका छोट्या गटाने ‘खलिस्तान जिंदाबाद’ सारख्या फुटीर घोषणा देऊन आमच्या पवित्र भिंती विद्रूप केल्या. आम्ही आमच्या समुदायाच्या इतिहासातील एका वेदनादायक क्षणाविषयी शोक व्यक्त करतो; कारण आम्ही ‘खालसा सजना दिवस’ (शिखांचे १० वे गुरु गोविंददेव सिंह यांनी ‘खालसा’ पंथ स्थापन केल्याचा दिवस) साजरा करण्यासाठी एकत्र येतो. हा दिवस शिखांची शक्ती, एकता आणि लवचिकता यांचे प्रतीक आहे. हे कृत्य कॅनडातील शीख समुदायात भीती आणि फूट निर्माण करू पहाणार्या आतंकवादी शक्तींच्या मोहिमेचा एक भाग आहे.
वर्ष १९०६ मध्ये स्थापन झालेल्या या गुरुद्वाराने गेल्या आठवड्याच्या शेवटी बैसाखी संचलन आणि ‘नगर कीर्तन’ आयोजित केले होते, ज्यामध्ये खलिस्तान समर्थक गटांना सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली होती.
संपादकीय भूमिकाजिहादी आतंकवादी जसे नमाजपठणाच्या वेळी मशिदीत बाँबस्फोट करून मोठ्या संख्येत धर्मबंधू असणार्या मुसलमानांना ठार मारतात, तसाच प्रकार आता खलिस्तानी करू लागले आहेत, हेच या घटनेतून लक्षात येते ! |