|

अमृतसर (पंजाब) – येथील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक ३ च्या बाहेर २१ फेब्रुवारीच्या रात्री स्फोट झाला. याची माहिती मिळताच पोलीस आणि सैन्याधिकारी घटनास्थळी पोचले अन् त्यांनी प्रकरणाचे अन्वेषण चालू केले आहे. त्याच वेळी सैन्याधिकारी आणि पोलीस अधिकारी येथे कोणत्याही प्रकारचा स्फोट झाल्याचे पूर्णपणे नाकारत आहेत. दुसरीकडे परदेशात बसलेला खलिस्तानी आतंकवादी हॅपी पसियान याने सामाजिक माध्यमांतून पोस्ट करून या स्फोटाचे दायित्व स्वीकारले आहे. त्याने म्हटले की, या स्फोटामागील कारण म्हणजे भारत सरकारने मणीपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली, हे आहे.