UP Babbar Terriorist Arrested : कौशांबी (उत्तरप्रदेश) येथून खलिस्तानी आतंकवाद्याला अटक

  • हातबाँब आणि स्फोटके जप्त

  • गेल्या वर्षी पोलिसांच्या कह्यातून पळाला होता

खलिस्तानी आतंकवादी लाजर मसीह

कौशांबी (उत्तरप्रदेश) – खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’च्या लाजर मसीह नावाच्या एका आतंकवाद्याला येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ३ हातबाँब, २ डेटोनेटर, १ परदेशी पिस्तूल आणि १३ काडतुसे जप्त करण्यात आली. याखेरीज गाझियाबादचा पत्ता असलेले आधार कार्ड आणि सिम कार्ड नसलेला भ्रमणभाष संचही जप्त करण्यात आला आहे. तो ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’च्या जर्मनीस्थित गटाचा प्रमुख स्वर्ण सिंह उपाख्य जीवन फौजी याच्यासाठी काम करत होता. तसेच पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस.आय.शीही (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्सशही) थेट संपर्कात होता. तो पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील कुर्लियाना गावचा रहिवासी आहे. गेल्या वर्षी २४ सप्टेंबर या दिवशी लाजरस मसिह पंजाब पोलिसांच्या कह्यातून पळून गेला होता. (याला उत्तरदायी असणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

जिहादी आतंकवाद्यांप्रमाणेच खलिस्तानी आतंकवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी युद्ध पातळीवर पावले उचलणे आवश्यक !