श्री क्षेत्र द्वारापूर, धारवाड (कर्नाटक) येथील संत श्री परमात्माजी महाराज यांची वाराणसी येथील सनातन संस्थेच्या सेवाकेंद्राला सदिच्छा भेट !

सेवाकेंद्रातील युवा साधकांना पाहून ते म्हणाले, ‘‘या सर्वांचे परमभाग्य आहे. त्यांचे जीवन यासाठीच आहे; म्हणून ते एवढ्या लहान वयात सेवाकेंद्रात राहून साधना करत आहेत.’’

रत्नागिरी जिल्ह्यातील पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेली भावभेट !

निवळी (ता. चिपळूण) येथील पू. बांद्रे महाराज सनातन संस्थेच्या गोवा येथील रामनाथी आश्रमाला भेट देण्यासाठी आले होते., तेव्हा त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली होती. त्या वेळी त्यांच्यामध्ये झालेला भावसंवाद येथे दिला आहे. आज या लेखाचा शेवटचा भाग येथे देत आहोत.

रत्नागिरी जिल्ह्यातील पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेली भावभेट !

पू. बांद्रे महाराज यांच्या मनात सनातन संस्थेविषयी विशेष स्नेह निर्माण झाला होता. ते आणि त्यांचे भाऊ श्री. शिवराम बांद्रे सनातन संस्थेच्या गोवा येथील रामनाथी आश्रमाला भेट देण्यासाठी आले होते, त्या वेळी त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली होती. त्या वेळी त्यांच्यामध्ये झालेला भावसंवाद क्रमशः देत आहोत.

सर्व साधू आणि महात्मे यांनी धर्मावरील आघातांच्या विरोधात प्रखरतेने अन् संघटितपणे लढणे आवश्यक ! – अनंतविभूषित श्री जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्‍वराचार्यजी, श्री रुक्मिणी विदर्भ पीठ, कौंडण्यपूर 

हिंदु जनजागृती समितीद्वारे श्री जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी यांची भेट घेतली गेली.

हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात जागृती करण्याची आवश्यकता ! – महामंडलेश्‍वर बालयोगी आचार्य श्री स्वामी सत्यात्मानंद गिरिजी महाराज

हिंदूंच्या अनेक संस्था असल्या, तरी समाजात जाऊन लोकांना जागृत करून त्यांना संघटित करणे आवश्यक ! देशात सहस्रो पशूवधगृहे असून त्यांचा विरोध करायला हवा.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोहम् आश्रमाचे स्वामी सत्यानंद महाराज यांची घेण्यात आली भेट !

समितीचे श्री. सुनील घनवट आणि श्री. हरिकृष्ण शर्मा यांनी सोहम् आश्रमाचे स्वामी सत्यानंद महाराज यांची भेट घेतली. या वेळी श्री. घनवट यांनी महाराजांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली.

हिंदु राष्ट्राच्या कार्यात मी तुमच्या समवेत आहे ! – श्री महंत स्वामी कृष्णानंद महाराज, श्री आनंदाश्रम, हरिद्वार

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात सर्वांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे. या कार्यात मी तुमच्या समवेत आहे. सर्व संत एकत्रित प्रयत्न करूया, असे प्रतिपादन श्री महंत स्वामी कृष्णानंद महाराज यांनी केले.

हिंदु जनजागृती समिती साधूसंतांचे कार्य करत आहे ! – स्वामी सुरेशदास महाराज

भगवी वस्त्रे घालून साधूसंत जे कार्य करत आहेत, तेच कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. तुमचे कार्य अनुकरणीय आहे. समितीच्या कार्याला माझे नेहमी सहकार्य राहील, असे गौरवोेद्गार स्वामी सुरेशदास महाराज यांनी येथे काढले.

प्रत्येक सरकार हिंदुत्वाच्या नावावर केवळ मतपेटी बनवत आहे ! – स्वामी कल्याण देव महाराज

कोणतेही सरकार हिंदुत्वाच्या नावावर केवळ मतपेटी बनवत आहे. हिंदु संस्कृतीवर कोणता आघात झाला, तर सर्व साधूसंतानी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे, तरच हे राष्ट्र ‘हिंदु राष्ट्र’ होऊ शकते.

हिंदूंवरील अन्यायाच्या विरुद्ध जागृती करून संघटन निर्माण करण्याची आवश्यकता ! – स्वामी योगेंद्रानंद शास्त्री

साधूसंतांवर अन्याय होत आहे. देशात ठिकठिकाणी हिंदूंची पिळवणूक होत आहे. हे सर्व रोखण्यासाठी हिंदूंमध्ये जागृती करून संघटितपणा वाढवण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन स्वामी योगेंद्रानंद शास्त्री यांनी केले.