धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
हरिद्वार येथील कुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’
हरिद्वार, १४ एप्रिल (वार्ता.) – भगवी वस्त्रे घालून साधूसंत जे कार्य करत आहेत, तेच कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. तुमचे कार्य अनुकरणीय आहे. समितीच्या कार्याला माझे नेहमी सहकार्य राहील, असे गौरवोेद्गार येथील श्री पंचायती नया उदासीन निर्वाण आणि सीताराम आश्रमाचे (हरिद्वार) स्वामी सुरेशदास महाराज यांनी येथे काढले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवले जात आहे. या अंतर्गत समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी स्वामीजींची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी समितीचे श्री. हरिकृष्ण शर्मा आणि धर्मप्रेमी श्री. संजीव पुंडिर उपस्थित होते.
या वेळी श्री. घनवट यांनी स्वामीजींना राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात अन् कुंभमेळ्यात लावलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्र’ यांविषयी माहिती दिली. त्यावर स्वामी सुरेशदास महाराज म्हणाले, ‘‘मी स्वत: अन्य साधूसंतांना घेऊन केंद्राला भेट देणार असून संत संमेलनालाही उपस्थित रहाणार आहे.’’