हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोहम् आश्रमाचे स्वामी सत्यानंद महाराज यांची घेण्यात आली भेट !

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती

हरिद्वार येथील कुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’

स्वामी सत्यानंद महाराज यांना निमंत्रण देतांना समितीचे कार्यकर्ते

हरिद्वार, १५ एप्रिल (वार्ता.) – येथील कुंभमेळ्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवले जात आहे. या अभियानाच्या अंतर्गत समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट अन् समितीचे श्री. हरिकृष्ण शर्मा यांनी सोहम् आश्रमाचे स्वामी सत्यानंद महाराज यांची भेट घेतली. या वेळी श्री. घनवट यांनी महाराजांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. त्यावर महाराजांनी ‘समितीचे कार्य ऐकून प्रसन्न झालो’, असे सांगितले. या प्रसंगी महाराजांना ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रणही देण्यात आले.

स्वामी सत्यानंद महाराज यांचा परिचय

वृंदावन येथे स्वामी सत्यानंद महाराज यांचा आश्रम असून ते हिंदु राष्ट्राच्या विचाराने प्रेरित आहेत. या आश्रमामध्ये गुरुकुल असून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासह अध्यात्माचे शिक्षणही दिले जात आहे. स्वामी सत्यानंद महाराज त्यांच्या सत्संगातून सनातन संस्कृतीवर होणार्‍या आघातांविषयी मार्गदर्शन करत असतात.