श्री उदासीन कार्ष्णि आश्रमाचे श्री गुरु शरणानंद यांची हिंदु जनजागृती समितीकडून घेण्यात आली भेट !

हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीकडून चालवण्यात येत असलेल्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ अंतर्गत श्री उदासीन कार्ष्णि आश्रमाचे श्री गुरु शरणानंद यांची भेट घेण्यात आली.

हिंदु जनजागृती समितीचे हिंदु धर्म आणि संस्कृती रक्षणाचे कार्य प्रेरणादायी ! – श्री १००८ श्री कमलानंद गिरि

तुम्ही किती तळमळीने हे कार्य करत आहात, हे दिसत आहे. तुमच्या प्रबोधन केंद्राला अवश्य भेट देऊ, असे प्रतिपादन येथील श्री कल्याण कमल आश्रमाचे श्री १००८ श्री कमलानंद गिरि यांनी केले.

राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांविषयी साधूसंतांनी कृतीशील होणे, ही काळाची आवश्यकता ! – स्वामी सुरेश महाराज

स्वामी सुरेश महाराज यांनी ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे. या कार्याची समाजाला आवश्यकता आहे’, असे म्हटले. महाराजांना ‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट देण्याचे निमंत्रणही देण्यात आले.

हिंदु जनजागृती समिती करत असलेले धर्म कार्य आवश्यकच ! – महंत बाबा हरपाल दास

हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या हिंदु धर्म जागृतीच्या कार्याची सध्या आवश्यकताच आहे. तुम्ही हे कार्य करत आहात, याचा मला आनंद झाला, असे कौतुकोद्गार कलनौर, पानिपत येथील महंत बाबा हरपाल दास यांनी केले.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज आणि पू. सौरभ जोशी यांची भावभेट !

पू. सौरभदादा म्हणजे जीवात्मा आणि शिवात्मा एकरूप झाल्याचे उदाहरण आहे. ते सतत आनंदात असतात. त्यांच्याकडे भक्तीभाव असलेला मनुष्य आला की, त्यांना पुष्कळ आनंद होतो.

हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फलक प्रदर्शनामुळे लाखो भाविकांपर्यंत धर्मरक्षणाचा विषय पोचेल ! – पू. आशिष गौतम

समितीचे धर्मशिक्षण, राष्ट्र आणि धर्म रक्षण यांविषयीचे कार्य ऐकून पू. आशिष गौतम यांनी कुंभपर्वात त्यांच्या आश्रमामध्ये होणार्‍या कार्यक्रमात समितीच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फलकांचे प्रदर्शन लावण्यास अनुमती दिली.

पू. सदानंद भस्मे महाराज यांचे सनातनच्या रामनाथी आश्रमात वास्तव्य असतांना आणि त्यांच्या कीर्तनाच्या वेळी कु. मधुरा भोसले यांना आलेल्या अनुभूती !

२५.११.२०२० या दिवशी श्री. सदानंद भस्मे महाराज यांना ‘संत’ घोषित करण्यात आले. पू. सदानंद भस्मे महाराज यांचे आश्रमात वास्तव्य असतांना आणि त्यांच्या कीर्तनाच्या वेळी देवाच्या कृपेने मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

हिंदु जनजागृती समितीचे आपत्काळाच्या विषयीचे जनजागृतीचे कार्य काळानुरूप ! – पूज्य श्री तारा मां

हिंदु जनजागृती समितीचे चालू असलेले आपत्काळाच्या विषयीचे जनजागृतीचे कार्य उत्तम असून ते काळानुसार आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘श्री तारा मां मिशन’च्या प्रेरणास्रोत पूज्य श्री तारा मां यांनी येथे केले.

रायपूर (छत्तीसगड) येथील संतश्री पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज यांची रामनाथी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

सनातन संस्था, सनातन प्रभात, हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य म्हणजे भारताच्या पुनरुत्थानाचे कार्य आहे. या कार्याला आश्रय देणे, सहकार्य करणे, त्यात सहभाग घेणे, हे प्रत्येकाने करायला हवे.

पू. विनयानंदस्वामी यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

पू. विनयानंदस्वामी यांनी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली आणि आश्रमात चालू असलेले राष्ट्र, धर्म अन् आध्यात्मिक संशोधन यांविषयीचे कार्य जाणून घेतले. पू. स्वामींचा एक आश्रम आणि कालिमातेचे मंदिर आहे.