सनातनच्या साधकांकडून रमणरेती वृंदावन आश्रमाचे व्यवस्थापक संत श्री गोविंदाचार्य यांची सदिच्छा भेट

रमणरेती वृंदावन आश्रमाचे व्यवस्थापक संत श्री गोविंदाचार्य यांना पंचांग दाखवतांना सनातन संस्थेचे श्री. अरविंद गुप्ता

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथे श्री राधेश्वर महादेव मंदिराच्या ६२ व्या वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रमणरेती वृंदावन आश्रमाचे व्यवस्थापक संत श्री गोविंदाचार्य आले असता त्यांची सनातन संस्थेच्या साधकांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या वेळी सनातन संस्थेचे श्री. अरविंद गुप्ता यांच्या हस्ते त्यांना सनातनचे हिंदी पंचांग भेट म्हणून देण्यात आले. पंचांग पाहून त्यांना अतिशय आनंद झाला, ते म्हणाले, ‘‘हे पंचांग अतिशय चांगले आहे आणि यात पुष्कळ चांगली माहिती देण्यात आली आहे.’’  या वेळी त्यांनी सनातनच्या साधकांना रमणरेती आश्रमामध्ये येण्याचे निमंत्रण दिले.