गड-दुर्ग यांचे जतन आणि संवर्धन यांसाठी पुरातत्व विभाग, इतिहास अभ्यास, स्थापत्यतज्ञ आणि दुर्गप्रेमी एकत्रित !
घाटकोपर येथे राज्यस्तरीय परिषद !
घाटकोपर येथे राज्यस्तरीय परिषद !
या स्वच्छतेत अवघड ठिकाणी उगवलेली झाडे-झुडपे काढण्यासाठी गिर्यारोहणाच्या तंत्राचा वापर करण्यात आला. या स्वच्छतेत देवस्थान समिती, ग्रामपंचायत जोतिबा, जिल्हा प्रशासन, ‘समित ॲडव्हेंचर’ यांचे सहकार्य लाभले, तसेच ‘हिल रायडर्स फाऊंडेशन’आणि ‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’ यांचे मार्गदर्शन लाभले.
‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या वतीने मुख्यमंत्र्यांना ‘विशाळगडावरील सर्व अतिक्रमणाच्या संदर्भात येणारे सर्व अडथळे दूर करून गडावरील मंदिरे आणि योद्ध्यांची स्मारके यांचा जीर्णाेद्धार करा’, या मागणीचे निवेदन देण्यात आले.
सरकार किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी कायद्यात पालट करण्याचा विचार करत आहे. उपाहारगृहांसमवेत मद्यालये चालू होणार नाहीत, याची काळजी घेऊन ऐतिहासिक किल्ल्यांचे पावित्र्य टिकवणे आवश्यक आहे !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘एक दिवस शिवाजी महाराजांच्या सानिध्यात’ अभियान !
या मोहिमेच्या अंतर्गत किल्ल्यावरील पालापाचोळा, प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला, तसेच गवत काढण्यात आले आणि काटेरी झाडे तोडण्यात आली.श्री भवानीदेवीच्या मंदिरात सामूहिक नामजप करण्यात आला. त्यानंतर गड भ्रमंती करून सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती घेण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वृत्तीची तरुण पिढी निर्माण करण्यासाठी आणि तरुण पिढीला ध्येयवादी बनवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ असा दृष्टीकोन ठेवून भुईकोट गड येथे एकदिवसाच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
‘जागतिक वनदिना’चे औचित्य साधत शिवनेरीवर प्लास्टिक बंदीची संकल्पना राबवण्यात येणार आहे. शिवनेरीवरील जैवविविधता अबाधित रहावी आणि पर्यटकांना शिवनेरीवर येण्यासाठी भुरळ पडावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील पनवेलपासून जवळच असलेल्या कर्नाळा गडावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एक दिवस गड-दुर्गांच्या सान्निध्यात’ मोहीम घेण्यात आली. गडदेवता श्री कर्नाईमाता देवीच्या मंदिराची स्वच्छता करून तेथे नामजप करण्यात आला.
छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने मावळ्यांनी हा गड पोर्तुगीजांकडून मिळवला होता. आरंभी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून गडाची स्वच्छता करण्यात आली. या वेळी गडावरील पालापाचोळा, प्लास्टिकचा कचरा उचलण्यात आला.