गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमण हटवून तेथे पुन्हा भगवा फडकाण्यासाठी संघर्ष चालूच रहाणार ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्रातील शौर्याचे प्रतीक असलेल्या गड-दुर्गांवरील आक्रमण म्हणजे लँड जिहादचा प्रकार आहे. गड-दुर्गांमुळे छत्रपती शिवाजी महारांजांचे स्मरण होते. सध्याच्या स्थितीत तेथे मशीद, मजार, कबरी यांमुळे ‘ते मोगलांचे आहेत कि काय ?’, असे वाटते.

भारतीय पुरातत्‍व विभागाला लोहगडावरील अतिक्रमण हटवण्‍याची केली मागणी

मावळ तालुक्‍यातील लोहगडावर मागील काही काळापासून अतिक्रमणे वाढू लागली आहेत. सदरची अतिक्रमणे तात्‍काळ काढून टाकत लोहगड अतिक्रमणमुक्‍त करावा, या मागणीसाठी १८ जून या दिवशी मावळ तालुका, पुणे जिल्‍हा आणि पश्‍चिम महाराष्‍ट्र येथून मोठ्या संख्‍येने समस्‍त हिंदु बांधव एकवटले होते.

३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राजगडावर भव्य सोहळा संपन्न समस्त हिंदू बांधव संघटनेच्या वतीने सोहळ्याचे आयोजन

समस्त हिंदू बांधव संघटनेच्या वतीने ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त २ जून या दिवशी राजगडावर भव्य राज्याभिषेक सोहळा पार पडला. या सोहळ्याला विविध मावळ्यांच्या वंशजांनी उपस्थिती लावली होती.

विशाळगड (जिल्हा कोल्हापूर) येथील अतिक्रमण काढण्याचे घोंगडे भिजत !

विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती, विविध गडकोट संघटना, हिंदुत्वनिष्ठ यांनी दिलेल्या लढ्यामुळे जिल्हाधिकारी यांनी विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले.

मुसलमानांच्या भीतीने दुर्गाडी गडावर महाराष्ट्र दिन साजरा करण्यास अनुमती नाकारली !

असे पोलीस काम कुणासाठी करतात, महाराष्ट्र शासनासाठी कि अतिक्रमण करणार्‍यांसाठी ?

राजगडाचा पायाभूत विकास आराखडा अंतिम टप्प्यात !

आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने राजगडाचा पायाभूत विकास आराखडा सिद्ध करण्यात येत आहे. हा आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे.

तोरणागडाच्या (पुणे) तटबंदीखाली ३ शिवकालीन गुहा सापडल्या !

वेल्हे तालुक्यातील तोरणागडाच्या तटबंदी खाली मेटपिलावरे मार्गांकडून बुधला माचीकडे आडबाजूला ३ शिवकालीन गुहा उजेडात आल्या आहेत.

ठाणे येथील ऐतिहासिक नागला बंदर गड खाणमालकांकडून नामशेष ! – पुरातत्व विभाग

यास उत्तरदायी असणार्‍यांना सरकारने आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा दिली पाहिजे !

पुणे ग्रामीण पोलिसांकडून ‘वारसा स्‍वच्‍छतेचा, मावळा शिवरायांचा’ मोहिमेला प्रारंभ !

अशी मोहीम पोलिसांना का राबवावी लागते ? पुरातत्‍व विभाग काय करत आहे ?

सिंधुदुर्ग : रेडी येथील यशवंतगडाच्या डागडुजीसाठी साडेपाच कोटी रुपये खर्च

एकीकडे शासन यशवंतगडाच्या डागडुजीसाठी साडेपाच कोटी रुपये खर्च करते, तर दुसरीकडे गडाच्या तटबंदीला धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने अवैधरित्या उत्खनन आणि बांधकाम केले जात असतांना पुरातत्व खाते त्याकडे दुर्लक्ष करते. यात शासनाचा पैसा वाया जाणार नाही का ?