सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यात ६ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी !

ठाणे, २५ जुलै (वार्ता.) – जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली आणि बदलापूर येथे एकूण ६ ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यांचा लाभ ७२५ हून अधिक साधक आणि जिज्ञासू यांनी घेतला. नौपाडा (ठाणे) येथील गुरुपौर्णिमेला भाजपचे महाराष्ट्र राज्य सचिव श्री. संदीप लेले आणि भाजपचे माजी नगरसेवक संदीप चव्हाण उपस्थित होते. सर्वच ठिकाणी ‘आनंदी जीवन आणि रामराज्याची स्थापना यासाठी साधना’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

ठाणे

हिंदु राष्ट्राची मागणी घराघरातून होणे आवश्यक ! – अधिवक्ता खुश खंडेलवाल, संस्थापक, हिंदु टास्क फोर्स

अधिवक्ता खुश खंडेलवाल

आज मोठ्या प्रमाणात हिंदु धर्मियांवर आघात होत आहेत. ते रोखण्यासाठी आपण संघटित होणे आवश्यक आहे. यावर ‘हिंदु राष्ट्र’ हाच एकमेव उपाय आहे. हिंदु राष्ट्राची मागणी घराघरातून होणे आवश्यक आहे. धर्मावरील आघात रोखण्याचे कार्य करतांना अडथळे येतात. त्या वेळी निराश न होता अध्यात्माला केंद्रस्थानी ठेवून साधना करत हे आघात रोखण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे.

प्रत्येक स्त्रीने मुलाला धर्मशिक्षण देणे काळाची आवश्यकता ! – ह.भ.प. सुनील महाराज भगत

ह.भ.प. सुनील महाराज भगत

हिंदु तरुणी मोठ्या प्रमाणात लव्ह जिहादला बळी पडत आहेत, काळ वाईट आहे. आपण स्त्रियांवर होत असलेले अत्याचार पहात आहोत. मुलांना शाळेत घालण्यासह धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.

हिंदु आपला वैभवशाली इतिहास विसरले ! – प्रशांत कोतवाल, राष्ट्रीय संघटक, भारत रक्षा मंच

प्रशांत कोतवाल

हिंदूंची मंदिरे शक्तीस्रोत आहेत. मंदिरांच्या माध्यमातून संघटन शक्तीही आत्मसात केली पाहिजे. हिंदु मंदिरात जातात ते केवळ वैयक्तिक भावनेने ! धर्मशिक्षण घेऊन जागृत झाले पाहिजे. आपण आपला वैभवशाली इतिहास विसरल्यामुळेच आज ही स्थिती आली आहे.

बदलापूर

गडांवरील अतिक्रमण हटवून त्यांचे संवर्धन होणे काळाची गरज ! –  राहुल खैर, संस्थापक / अध्यक्ष, मराठा वॉरियर्स गड-किल्ले संवर्धन, महाराष्ट्र

राहुल खैर

विशाळगडावरील अतिक्रमणावर झालेल्या कारवाईच्या विरोधात मुंब्रा येथे मुसलमान मोठ्या संख्येने एकत्र आले होते. गडांचे संवर्धन होणे काळाची आवश्यकता आहे. त्यांवरील अतिक्रमण दूर केले पाहिजे. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन कार्य करायला हवे.

निळजे

केवळ गुरुच शिष्याला काठीण प्रसंगात वाचवतात ! – महेंद्र पाटील, संचालक, सर्वाेदय हायस्कूल

महेंद्र पाटील

ज्याप्रमाणे प्रत्येक प्रसंगात श्रीकृष्णाने अर्जुनाला वाचावले, त्याप्रमाणे गुरु आपल्याला प्रत्येक कठीण प्रसंगात वाचवतात. गुरु जीवनात आल्यावरच आपल्याला ज्ञान मिळते, केवळ पुस्तकी ज्ञान परिपूर्ण नसते.