Vishalgad Encroachment : विशाळगड प्रकरणी परभणी येथे धर्मांधांचा मोर्चा !

विशाळगड

परभणी – विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्‍याच्‍या सूत्रावरून माजी खासदार संभाजीराजे यांच्‍या नेतृत्‍वाखाली हिंदूंनी आंदोलन केले होते. त्‍यामुळे शासनाला तेथील अतिक्रमणे हटवणे भाग पडले. त्‍यालाही न्‍यायालयाने नंतर स्‍थगिती दिली. विशाळगड येथे कथित आक्रमणाच्‍या कारणावरून परभणी येथे धर्मांधांनी मोर्चा काढला.

विशाळगडावर धर्मांधांनी केलेली अतिक्रमणे हटवण्‍याविषयी हिंदुत्‍वनिष्‍ठ मागील अनेक वर्षे आंदोलन करत आहेत. ‘विशाळगडावरील अतिक्रमण काढण्‍यासाठी प्रशासन कोणतीच कृती करत नसल्‍याने १४ जुलैला गडावर जाणार’, असे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी घोषित केले होते. त्‍यानुसार ते १४ जुलैला सकाळी ९ वाजता गडाकडे रवाना झाले. ते गडावर पोचण्‍यापूर्वीच सकाळी ११ वाजण्‍याच्‍या सुमारास विशाळगडावरील घरांवर काही अज्ञात तरुणांनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. यात काही घरांच्‍या काचा फुटल्‍या, तर काही दुकानांवरही दगडफेक करण्‍यात आली, तसेच दुचाकी आणि चारचाकी गाड्या फोडण्‍यात आल्‍या. या घटनेचे नंतर निधर्मीवादी पक्ष आणि संघटना यांनी मोठ्या प्रमाणात भांडवल करून आणि अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करून हिंदूंना दोष देण्‍याचा प्रयत्न चालवला होता.

संपादकीय भूमिका

एका ठिकाणी धर्मबांधवांवर काही कथित आक्रमण झाल्‍यावर दुसर्‍या ठिकाणचे धर्मांध लगेच त्‍यांना पाठिंबा देण्‍यासाठी मोर्चे वगैरे काढतात ! किती हिंदू त्‍यांच्‍या धर्मबांधवांवरील आघातांच्‍या विरोधात संघटित होतात ?