दैवी दौर्‍याच्या वेळी श्रीलंकेतील रामसेतूजवळ सनातनच्या साधकांविषयी कृतज्ञतापूर्वक श्रीरामाकडे प्रार्थना करतांना श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी काढलेले उद्गार !

श्रीलंकेतून रामसेतूवर गेल्यावर श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ फुले वाहून रामसेतूला भावपूर्ण नमस्कार करतांना

‘साधक ‘आपण करत असलेला दैवी प्रवास सुखरूप आणि चांगला व्हावा’, यासाठी सतत देवाकडे प्रार्थना करतात. त्या प्रार्थनेतील ऊर्जेच्या बळावर आणि त्यांच्या तळमळीच्या सेतूवरूनच आज आपण रामसेतूपर्यंत आलो आहोत. कलियुगात श्रीरामासमान रामराज्याची स्थापना करण्यास श्रीविष्णूचा अंशावतार असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या साधक वानरसेनेच्या चरणी माझा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !’

‘हे श्रीरामा, ‘गुरूंच्या रामराज्य स्थापनेच्या (हिंदु राष्ट्राच्या) या ईश्वरी कार्यात आम्हा सर्व साधकांनाही खारीचा वाटा उचलता यावा आणि गुरुकृपायोगाच्या सेतूवरून मार्गक्रमण करून मोक्षप्राप्ती करून घेता यावी’, ही तुझ्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.