प्रयाग येथील गंगेचे पूजन झाल्यावर तिची भावपूर्ण आरती केल्यास होणारे सूक्ष्मातील परिणाम !

सूक्ष्मचित्र – प्रयाग येथील गंगेचे पूजन झाल्यावर तिची भावपूर्ण आरती केल्यास होणारे सूक्ष्मातील परिणाम !

१. सनातनचे एक संत आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेले सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण

१ अ. भाव

१ अ १. आध्यात्मिक भावाचे वलय आरती करणार्‍या व्यक्तीच्या अनाहतचक्राच्या स्थानी कार्यरत होत असणे

१ आ. गंगामातेचे तत्त्व

१ आ १. गंगामातेच्या तत्त्वाचे कण गंगेच्या मूर्तीत आकृष्ट होत असणे : आरती करणार्‍या व्यक्तीमध्ये भाव असल्याने आरती करतांना गंगामातेचे तत्त्व मूर्तीत आकृष्ट होते. यामुळे मूर्तीमध्ये सजीवपणा येतो.

सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील अधोरेखित स्पंदनांचे प्रमाण निराळे येण्याचे कारण

सनातनचे काही सद्गुरु, संत आणि साधक सूक्ष्मातील ज्ञान मिळवतात. सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील अधोरेखित स्पंदनांचे प्रमाण हे साधकाची पातळी, काळ, सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता इत्यादी घटकांवर अवलंबून असते. साधक, संत आणि सद्गुरु या क्रमानुसार त्यांची सूक्ष्मातून जाणण्याची क्षमता वाढत जाते. त्यामुळे साधक, संत आणि सद्गुरु यांनी शोधून काढलेल्या एखाद्या सूक्ष्मातील स्पंदनांच्या टक्केवारीत भेद असू शकतो.

१ आ २. गंगामातेच्या तत्त्वाचे वलय गंगेच्या मूर्तीत कार्यरत होत असणे

१ आ ३. गंगामातेच्या तत्त्वाचे कणरूपी वलय मूर्तीतून वातावरणात प्रक्षेपित होत असणे

१ आ ४. गंगामातेच्या तत्त्वाच्या लहरी गंगानदीत प्रवाहित होत असणे : व्यक्ती गंगामातेची आरती भावपूर्ण करत असल्याने गंगामातेच्या तत्त्वाच्या लहरी गंगानदीत प्रवाहित होतात.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१ आ ५. गंगामातेच्या तत्त्वाचे कण वातावरणात प्रवाहित होत असणे : आरतीसाठी उपस्थित लोकांकडे हे कण आशीर्वाद स्वरूपात प्रवाहित होत असून भाव असलेले लोक अथवा भक्त यांना गंगामातेकडून मिळत असलेला हा आशीर्वाद अनुभवता येतो.

१ इ. चैतन्य

१ इ १. चैतन्याचे वलय आरती करणार्‍या व्यक्तीमध्ये कार्यरत होत असणे : आरती करणार्‍या व्यक्तीमध्ये भाव असल्याने चैतन्याचे वलय आरती करणार्‍या व्यक्तीमध्ये कार्यरत होते.

१ इ २. चैतन्याचे वलय गंगामातेच्या मूर्तीभोवती कार्यरत होत असणे

१ इ ३. चैतन्याचे कण वातावरणात आणि आरतीला उपस्थित असलेल्या लोकांकडे प्रवाहित होत असणे : गंगामातेची आरती भावपूर्ण केल्यास वातावरणात त्रासदायक स्पंदने न रहाता चैतन्य प्रवाहित होते.

– सनातनचे एक संत (२९.१२.२०२४)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक