पितांबरीच्या ‘इंद्रधनु व्हिलेज’चे भूमीपूजन पार पडले !

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’ यांच्या वतीने दापोलीजवळ साखळोली येथे ‘इंद्रधनु व्हिलेज’ या नावाने १०१ बंगल्यांचा प्रकल्प चालू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे भूमीपूजन पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते करण्यात झाले.

बनावट कागदपत्रे वापरून पिंपरी पालिकेची फसवणूक करणार्‍या ठेकेदारांचे रॅकेट उघडकीस !

येथील पालिकेची विकासकामे करणार्‍या ठेकेदारांनी अधिकार्‍यांच्या साथीने बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन कोट्यवधी रुपयांची कामे मिळवली असल्याचे रॅकेट उघडकीस झाले आहे. विशेषत: स्थापत्य विभागातील कामांमध्ये बनावट कागदपत्रांचा सर्रास वापर झाल्याचे समोर आले आहे.

६० वर्षांच्या महाराष्ट्रात ही परिस्थिती बघायला मिळते ! – नीलेश राणे, भाजप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री धनंजय मुंडे यांनी १२ डिसेंबर या दिवशी परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांचा वाढदिवस साजरा केला होता.

ग्रामपंचायतीमधील पोलीस शिपायाने वारंवार त्रास दिल्यामुळे पोलीस पाटील महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न !

पोलीस पाटील महिलेच्या तक्रारीची नोंद घेऊन पोलिसांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई न केल्यामुळेच शेवटी ग्रामस्थांवर कायदा हातात घेण्याची वेळ आली. पोलिसांनी तक्रारीची वेळीच नोंद घेतली असती, तर या महिलेवर आत्महत्येला प्रवृत्त होण्याची वेळ आली नसती.

आखरी रास्ता कृती समितीच्या निवेदनानंतर गंगावेस ते शिवाजी पूल वाहतूक एकेरी मार्ग चालू

गंगावेस ते शिवाजी पूल या मार्गावरील रस्त्याच्या एका टप्प्याचे काम सध्या पूर्ण झाले असून यातील शुक्रवार गेट ते शिवाजी पूल पाणीवाहिनी आणि भुयारी गटार वाहिनी यांचे काम चालू होत आहे.

शिंदेवाडी (जिल्हा सातारा) महिला सरपंचांना गावगुंडांचा त्रास !

सरपंचांचेही गावगुंडांना भय नसणे, हे चिंताजनक आणि दुर्दैवी !

मुंबई येथे घायाळ युवकाला रुग्णालयात नेण्यास नकार देणार्‍या टॅक्सीचालकांच्या विरोधात गुन्हा नोंद

३ टॅक्सीचालकांना पोलिसांनी विनंती करूनही त्यांनी घायाळ अवस्थेत पडल्याचे आढळूनही रावत यांना रुग्णालयात नेण्यास नकार दिला.

कुपवाड तलाठी कार्यालयातील तक्रारींचे निवारण न झाल्यास कार्यालयास टाळे ठोकू ! – भाजपचे अपर तहसीलदारांना निवेदन

प्रशासनाचा भोंगळ कारभार ! कार्यालयात कामे प्रलंबित का रहातात, तसेच प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे नियोजन का केले जात नाही ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष का घालत नाही ? यासाठी निवेदन का द्यावे लागते ?

ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र न लावण्याचे धर्मांध ग्रामसेवकाचे कारस्थान शिवप्रेमींनी उधळले !

तालुक्यातील नारूर ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांना कार्यालयात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र लावायचे नाही आणि नवीन चित्र खरेदी करायचे नाही, असे ग्रामसेवक आदम शहा यांनी सांगितले. याविषयी माहिती मिळताच शिवप्रेमी आणि सकल मराठा समाज यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

सांगलीच्या सरकारी घाटावर महापालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम, १ टन कचरा गोळा

सांगलीच्या कृष्णा नदीच्या सरकारी घाटावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छता मोहीम राबवली. यात घाटाच्या परिसरातून १ टन कचरा गोळा करण्यात आला. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने ही मोहीम राबवण्यात आली.