परळी (जिल्हा बीड) येथे खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसाचा केक खाण्यासाठी कार्यकर्त्यांचा गोंधळ

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री धनंजय मुंडे यांनी १२ डिसेंबर या दिवशी परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांचा वाढदिवस साजरा केला होता. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे यांनी परळीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते; मात्र कार्यक्रम संपल्यानंतर व्यासपिठावर ठेवण्यात आलेला ८१ किलोचा मोठा केक खाण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. व्यासपिठावर केक खाण्यासाठी झालेली गर्दी पाहून आयोजकांनी धाव घेत गर्दी नियंत्रणात आणली. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र कार्यक्रम होत असतांना सामाजिक माध्यमातून पवार यांच्यावर टीका करतांना भाजपचे नीलेश राणे म्हणाले, ‘‘मन खचून गेले हे बघून… महाराष्ट्रात ६० वर्षांमध्ये एक सम्राट होऊन गेले म्हणतात. काहींना स्वतंत्र महाराष्ट्राचे ‘जाणते राजे’ काही लोक म्हणतात. त्या ६० वर्षांच्या महाराष्ट्रात ही परिस्थिती बघायला मिळते.’’
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
TMC Rebellion : तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांचे बंड !
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती
भ्रमणभाषच्या जगात वावरतांना श्रीकृष्णाचे स्मरण ठेवा – ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास