पितांबरीच्या ‘इंद्रधनु व्हिलेज’चे भूमीपूजन पार पडले !

भूमीपूजनाच्या प्रसंगी उपस्थित श्री. रवींद्र प्रभुदेसाई (डावीकडे)

रत्नागिरी – ‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’ यांच्या वतीने दापोलीजवळ साखळोली येथे ‘इंद्रधनु व्हिलेज’ या नावाने १०१ बंगल्यांचा प्रकल्प चालू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे भूमीपूजन पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते करण्यात झाले. या प्रसंगी साखळोलीच्या सरपंच श्रीमती कांचन गौरत, उपसरपंच श्री. अनिल शिंदे, आर्किटेक्ट श्री. अभिजीत सायगावकर, पितांबरीचे सीईओ श्री. मधुकर पुजारी, जनरल मॅनेजर श्री. आनंद कदम, पितांबरी अ‍ॅग्रो टुरिझम आणि ‘इंद्रधनु व्हिलेज’ प्रकल्पाचे बिझनेस डेव्हलपमेन्ट मॅनेजर श्री. नरेंद्र बगाडे आदी मान्यवर उपस्थित होते. ‘या प्रकल्पासमवेत साखळोली आणि आसपासच्या गावांच्या आरोग्य सुविधेसाठी पितांबरीच्या रुग्णवाहिका लवकरच चालू करण्यात येणार असून आरोग्य चिकित्सा शिबिरांचेही आयोजन केले जाणार आहे’, असे श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी सांगितले.

‘इंद्रधनु व्हिलेज’ हा प्रकल्प दोन फेजमध्ये होणार असून पहिल्या फेजमध्ये AA, BB, CC, DD, EE असे पाच प्रकारचे ५० बंगले आणि ३ मजल्यांच्या २ अपार्टमेंट असणार आहेत. त्यात प्रत्येकी सहा फ्लॅट असतील. क्लब हाऊस, मंदिर, जलतरण तलाव, ओपन जीम आणि लहान मुलांसाठी बाग, खेळाचे पटांगण अशा वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध असतील. या प्रकल्पाच्या नावनोंदणीकरिता ९८९२३३९६६७/ ८६५७३०७२०२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पितांबरीच्या वतीने करण्यात आले आहे.