Ramdev Baba On Sharbat Jihad : आस्थापनाच्या सरबताच्या पैशांतून मशिदी आणि मदरसे बांधले जातात !

  • योगऋषी रामदेवबाबा यांच्याकडून पतंजलिच्या सरबताच्या विज्ञापनातून एका आस्थापनावर आरोप  

  • ‘सरबत जिहाद’ केला जात असल्याचाही केला दावा !

योगऋषी रामदेवबाबा

हरिद्वार (उत्तराखंड) – योगऋषी रामदेवबाबा यांनी त्यांच्या पतंजलि आस्थापनाची निर्मिती असणार्‍या सरबताच्या विज्ञापनातून ‘सरबत जिहाद’चा दावा केला आहे. त्यांनी एका आस्थापनाचे नाव न घेता त्याच्यावर गंभीर आरोप केल्याने देशात चर्चा चालू झाली आहे.

रामदेवबाबा यांनी म्हटले की, उन्हाळ्यात तहान भागवण्याच्या नावाखाली लोक थंड पेये पितात, जी मुळात शौचालय स्वच्छ करणारी असतात. एकीकडे शौचालय स्वच्छ करणार्‍या विषाचे आक्रमण आहे, तर दुसरीकडे सरबत विकणारे एक आस्थापन आहे, जे सरबतातून मिळालेल्या पैशांचा वापर मशिदी आणि मदरसे बांधण्यासाठी करते. ते ठीक आहे, हा त्यांचा धर्म आहे. त्या आस्थापनाचे सरबात प्यायाल्याने मशिदी आणि मदरसे यांच्या बांधकामासाठी निधी मिळतो, तर पतंजलिचे सरबत गुरुकुल, आचार्यकुलम्, पतंजलि विद्यापीठ आणि भारतीय शिक्षा मंडळ यांना साहाय्य करेल. म्हणूनच मी म्हणतो, जसे ‘लव्ह जिहाद’ आणि ‘व्होट जिहाद’ आहे, तसेच ‘सरबत जिहाद’देखील आह;  म्हणून तुम्ही या सरबत जिहादपासून स्वतःचे रक्षण केले पाहिजे.