जैन साधकांसारखी वस्‍त्रे परिधान करून मंदिरात चोरी करणारा चोर कह्यात !

जैन साधकांसारखी वस्‍त्रे परिधान करून मंदिरात सोन्‍याचे दागिने चोरणार्‍या चोराला स्‍वारगेट पोलिसांनी कह्यात घेतले. सॅलिसबरी पार्क भागात चोरी करतांना त्‍याचे सीसीटीव्‍ही कॅमेर्‍यात चित्रीकरण झाले होते.

भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्‍या मामांच्‍या मृतदेहावर दांड्याने मारल्‍याच्‍या खुणा !

विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे आधी अपहरण आणि त्‍यानंतर हत्‍या करण्‍यात आली. त्‍यांचा मृतदेह शिंदवणे घाटात सापडला.

विनापरवाना भंगार व्‍यवसाय करणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

चिखली, कुदळवाडी भागातील विनापरवाना भंगार दुकानचालक आणि बांगलादेशी, रोहिंग्‍या घुसखोर यांवर कठोर कारवाई करावी.

मध्‍यरात्रीपर्यंत ध्‍वनीवर्धक चालू ठेवणार्‍या कल्‍याणीनगरमधील हॉटेल मालकावर गुन्‍हे नोंद !

कल्‍याणीनगर भागातील ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर या भागात मध्‍यरात्रीपर्यंत चालू रहाणारे हॉटेल, पब विरोधात नागरिकांनी तीव्र रोष व्‍यक्‍त करत तक्रारी केल्‍या होत्‍या.

देखभाल रक्‍कम परत न केल्‍यामुळे बांधकाम व्‍यावसायिकाच्‍या कार्यालयासमोर रहिवाशांचे धरणे आंदोलन !

सिंहगड रस्‍त्‍यावरील ‘प्रयेजा पुरम सहकारी गृहनिर्माण संस्‍थे’च्‍या सभासदांकडून सोसायटी देखभालीसाठी घेतलेली रक्‍कम अनेकवेळा पाठपुरावा करूनही त्‍यांना बांधकाम व्‍यावसायिकाने परत केली नाही.

यंदाचा ‘पुणे पुस्‍तक महोत्‍सव’ विश्‍वविख्‍यात होईल ! – चंद्रकांत पाटील, आमदार, भाजप

पुणे शहर लेखन, वाचन, चिंतन आणि संशोधन यांची प्रयोगशाळा आहे. पुण्‍याच्‍या श्री गणेशोत्‍सवाप्रमाणेच यंदाचा ‘पुणे पुस्‍तक महोत्‍सव’ विश्‍वविख्‍यात होईल. पुणे पुस्‍तक महोत्‍सवाचे अनुकरण राज्‍यातील सर्व शहरांना करावेसे वाटत आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ‘आय.टी.एम्.एस्.’ प्रणालीद्वारे वाहनांवर लक्ष्य !

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ‘आय.टी.एम्.एस्.’ (इंटेलिजन्‍स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्‍टम) प्रणाली अंतर्गत ५२ ठिकाणी दोन्‍ही बाजूंनी कृत्रिम बुद्धीमत्तेवर (एआय) आधारित छायाचित्रक बसवण्‍यात आले आहेत.

१९ वर्षीय मद्यपी तरुणाकडून वाहनांना धडक !

तरुण पिढीने व्‍यसनाधीन होणे हे मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचे फलित ! मुलांवर योग्‍य संस्‍कार होण्‍यासाठी त्‍यांना शाळांमधून धर्मशिक्षण देणे आवश्‍यक !

आळंदी वारसास्‍थळ संवर्धनाचे दायित्‍व सर्वांचेच ! – ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक अरुण बोर्‍हाडे

भारतातील १८ शिवपिठांपैकी एक असलेल्‍या आळंदी देवाची येथील पुरातन वारसा असलेल्‍या तीर्थ आणि कुंड यांचा अभ्‍यास दौरा ‘इंद्रायणी साहित्‍य परिषदे’च्‍या वतीने आयोजित करण्‍यात आला होता. त्‍या वेळी अरुण बोर्‍हाडे बोलत होते.

भोसरी (पुणे) येथे सासर्‍याचा सुनेवर पतीसमोर लैंगिक अत्‍याचार !

समाजाची नैतिकता किती खालच्‍या स्‍तराला गेली आहे, याचे उदाहरण ! अशांना कठोर शिक्षा होणे आवश्‍यक !