
पुणे, ११ मार्च (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त २६ फेब्रुवारी या दिवशी ‘अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पुणे केंद्र’ यांच्या वतीने निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील खुल्या गटात श्री. श्रीकांत विठ्ठल ताम्हनकर यांच्या ‘सावरकर- एक क्रांतीकारक’ या निबंधास प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. त्या निमित्ताने श्री. ताम्हनकर यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्यांना प्रशस्तीपत्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली. ताम्हनकर हे सावरकर अभ्यासक आहेत, तसेच ते साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचक असून ते दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी लिखाण करत असतात.