विनापरवाना टर्मिन इंजेक्शनची विक्री करणार्‍या दोघांना हडपसरमध्ये अटक !

हडपसर (जिल्हा पुणे) – विनापरवाना मॅफेनटरमाईन सल्फेट (टर्मिन) इंजेक्शनची विक्री करणार्‍या दोघांना मोरे वस्ती, हडपसर येथे पोलीस पथकाने अटक केली. दोघांकडून १ लाख रुपये किमतीच्या टर्मिन इंजेक्शनच्या १९० बाटल्या जप्त करण्यात आल्या. योगेश राऊत, निसार शेख अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस शिपाई महेश चव्हाण यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.