पुणे येथे गांजा जप्त !

पुणे – मुंढवा भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या प्रमोद कांबळे आणि विशाल पारखे यांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १६ लाख ८० सहस्र रुपयांचा २८ किलो गांजा जप्त केला आहे. पुढील अन्वेषण चालू आहे.

संपादकीय भूमिका

संस्कृतीचे माहेरघर असणार्‍या पुणे येथे गांजा सापडणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !