उत्तरप्रदेशमध्ये ९ जणांची इस्लाम सोडून हिंदु धर्मात ‘घर वापसी’

मुझफ्फरनगर येथे ९ जणांनी इस्लाम सोडून हिंदु धर्मात ‘घर वापसी’ केली. हिंदु धर्म स्वीकारणारे हे कुटुंब मूळचे सहारनपूरचे आहे. त्यांच्या पूर्वजांनी दीडशे वर्षांपूर्वी दबावाखाली इस्लाम पंथ स्वीकारला होता. आता ते स्वेच्छेने हिंदु धर्मात परतले आहेत.

धरणगाव (जिल्हा जळगाव) येथे धर्मांधांनी शासकीय गायरान भूमीवर केलेले अतिक्रमण प्रशासनाने हटवले !

धर्मांधाकडून सर्वत्र होणारा भूमी जिहाद थांबवण्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता !

पुन्हा एकदा आरंभ !

‘संपूर्ण देशात हिंदु पीडितांना संरक्षण कसे मिळेल ?’, हे पहावे लागेल. त्याचसमवेत त्याला विरोध करणार्‍या हिंदुविरोधकांना शांत ठेवून राष्ट्रहित साधणे यासाठी सरकारचे कौशल्य पणाला लागेल ! नागरिकत्व सुधारणा कायद्याचा उद्देश समजून घेऊन त्यासाठी सरकारला संघटितपणे पाठिंबा द्यायला हवा !

‘ट्विटर’ची ‘चिमणी’ मुक्त झाली !

ट्विटर खरेदी केल्यानंतर आणि तिघा अधिकार्‍यांची हकालपट्टी केल्यानंतर मस्क यांनी उगाच ट्वीट केले नाही, ‘चिमणी मुक्त झाली….चांगले दिवस येऊ देत !’ केवळ ट्विटरच नव्हे, तर सर्वच प्रकारच्या सामाजिक माध्यमांवरील साम्यवादी कीड नष्ट होऊन राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांना विचारस्वातंत्र्याचा अनुभव येणे आवश्यक आहे !

हिंदु जनरेट्यापुढे झुकत आस्थापनांना त्यांच्या विज्ञापनांमध्ये पालट करणे भाग पडले !

आतापर्यंत विविध आस्थापनांच्या दिवाळीसंदर्भातील विज्ञापनांमध्ये हिंदूंच्या सांस्कृतिक चिन्हांचा उपयोग केला जात होता; परंतु गेल्या ४-५ वर्षांतील विज्ञापनांत पणत्या, रांगोळ्या, फुले आणि त्यानंतर हिंदु स्त्रियांच्या कपाळावरील कुंकू गायब होत गेले.

उज्जैन (मध्यप्रदेश) येथील महाकालेश्‍वर मंदिराच्या परिसरातील ‘महाकाल लोक’ संकुलाचे उद्घाटन  

पूर्वी २.८ हेक्टरमध्ये पसरलेले महाकाल संकुल आता ४७ हेक्टरचे झाले आहे. यात ९४६ मीटर लांबीचा मार्ग असणार आहे. यामुळे भाविक थेट मंदिराच्या गर्भगृहात पोचू शकणार आहेत.

हिंदूंनो, ‘हलाल’ ही इस्लामी अर्थव्यवस्था मोडून काढा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

केवळ मांसासाठी असलेले हलाल प्रमाणपत्र आता खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, औषधे, रुग्णालये येथेही देण्यात येत असून यासहित मोठी बहुराष्ट्रीय आस्थापनेही ‘१०० टक्के हलाल प्रमाणित’ असल्याची घोषणा करत आहेत. हाच पैसा पुढे जिहादी आतंकवादासाठी वापरला जात आहे.

आजपासून दुबईतील पहिल्या हिंदु मंदिरात भाविकांना मिळणार प्रवेश !

प्रतिदिन १ सहस्र ते १ सहस्र २०० भाविक या मंदिरात दर्शन घेऊ शकणार आहेत. मंदिरात १६ देवतांच्या मूर्ती असणार आहेत.

मागील वर्षी महिलांना कुंकवाविना दाखवणार्‍या आस्थापनांनी यावर्षी दागिन्यांच्या विज्ञापनांत महिलांना कुंकवासहित दाखवले !

धर्मप्रेमी हिंदूंनी तत्परतेने केलेल्या विरोधाचा परिणाम ! असा संघटितपणा आणि तत्परता हिंदूंनी प्रत्येकच आघाताच्या वेळी दाखवावी !

‘हर घर भगवा’ मोहिमेत सहभाग घेऊन हिंदु राष्ट्रासाठी सीमोल्लंघन करा !

आपण सर्वांनी आपल्या घरांवर भगवा ध्वज फडकवला, तर विजयदशमीच्या या पवित्र शुभमुहुर्तावर हिदु एकता, हिंदु अस्मिता आणि हिंदूऐक्य यांचे दर्शन घडेल.