५ वर्षीय मुलीवर अत्याचार करणार्या धर्मांधाला अटक !
मुंबई – ५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या ३० वर्षीय रफी अहमद किडवाई याला पोलिसांनी अटक केली. पीडित मुलगी घराशेजारी खेळत असतांना धर्मांधाने तिला उचलून घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. (पालकांनी धर्मांधांपासून आपल्या लेकीबाळींचे रक्षण करायला हवे ! – संपादक) पोलिसांनी ‘पॉक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
धर्मांधांच्या अत्याचारामुळे मुलीची आत्महत्या
वसई (जिल्हा पालघर)- गालिब शेख (वय २० वर्षे) याने मुलीला फूस लावून उत्तरप्रदेश येथून काशिमिरा येथे आणले. पेणकर पाडा येथील एका खोलीत ठेवून तिच्यावर अत्याचार केले. यामुळे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी गालिब शेख आणि त्याचा साथीदार महंमद तालीब शेख (वय २२ वर्षे) या दोघांविरोधात अपहरण आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे, तसेच बलात्कार केल्याप्रकरणी पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
संपादकीय भूमिका : अशा वासनांधांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे !
राज्यात चिकनगुनियाची रुग्णसंख्या तिप्पट !
डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ५७ टक्के वाढ
नागपूर – राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत डेंग्यू आणि चिकनगुनिया यांचे रुग्ण वाढत आहेत. १ जानेवारी ते २१ जुलै या कालावधीत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ५७ टक्के वाढ झाली असून चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत तिप्पट वाढ झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, राज्यात १ जानेवारी ते २१ जुलै २०२४ या काळात डेंग्यूचे ४ सहस्र ९६५ रुग्ण, तर चिकनगुनियाचे १ सहस्र ७५ रुग्ण आढळले.
तरुणीची भीतीपोटी आत्महत्या !
छत्रपती संभाजीनगर – येथील बी.एच्.एम्.एस्.च्या दुसर्या वर्षात शिकणार्या गायत्री दाभाडे या तरुणीने वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ‘मैत्री कर’, ‘भेटायला ये’, असे म्हणून आरोपी दत्तू गायके विद्यार्थिनीला गेल्या वर्षभरापासून त्रास देत होता. ‘माझ्यावर प्रेम केले नाही, तर आत्महत्या करीन’, अशी धमकीही तरुणाने गायत्रीला दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
संपादकीय भूमिका : तरुणींनो, वेळीच सक्षम व्हा !