पुणे शहरातील ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्या रुग्णांचा वैद्यकीय व्यय महापालिका उचलणार !

पुणे – ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्या (‘जी.बी.एस्.’च्या) रुग्णांच्या उपचारांचा व्यय ५ लाख रुपयांपेक्षा अधिक होत आहे. राज्य सरकारच्या ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजने’तून या आजारांवर उपचार होत आहेत. या रुग्णांच्या उपचाराचा व्यय (खर्च) पुणे महापालिका उचलणार आहे. गरीब रुग्णांना हा खर्च परवडणारा नसल्यामुळे महापालिकेने असा निर्णय घेतला आहे, असे आयुक्तांनी सांगितले आहे.

महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे म्हणाल्या, ‘‘या रुग्णांवरील उपचाराचा व्यय अधिक आहे. उपचारांच्या व्ययात महापालिका योगदान देणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीत आढळून आलेल्या रुग्णांना त्याचा लाभ होईल.’’