३ सहस्र ५०० हून अधिक भारतीय आस्थापनांमध्ये चिनी संचालक !

केंद्रशासनाने संसदेत माहिती देतांना ‘देशात अनुमाने २०० चिनी आस्थापने ‘विदेशी आस्थापने’ म्हणून नोंदणीकृत आहेत. यासह देशातील ३ सहस्र ५०० हून अधिक भारतीय आस्थापनांमध्ये चिनी संचालक आहेत’, असे सांगितले.

आंदोलन, संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा हिंदु धर्माभिमान्यांचा निर्धार !

भारत आणि नेपाळ अनादि काळापासून हिंदु राष्ट्र होते; परंतु धर्मनिरपेक्षतेच्या दुष्टचक्रात फसल्यामुळे येथील हिंदूंचे दमन होत आहे. अशा परिस्थितीत परिवर्तन आणण्यासाठी येथे परत घटनात्मकरित्या हिंदु राष्ट्र स्थापन करणे अनिवार्य आहे.

इराकमध्ये संसदेत घुसून सहस्रो आंदोलकांचा गोंधळ

इराकमध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून इराण समर्थक व्यक्तीचे नाव घोषित केल्याच्या विरोधात आंदोलन चालू झाले आहे. सहस्रो आंदोलकांनी २७ जुलैच्या रात्री इराकच्या संसदेत घुसून इराकी झेंडे फडकवत गोंधळ घातला.

राज्यसभेत गदारोळ घालणार्‍या १९ खासदारांचे एका आठड्यासाठी निलंबन !

केवळ निलंबन नको, तर त्यांच्याकडून अधिवेशनासाठीचा वेळ वाया घालवण्यावरून दंड वसूल केला पाहिजे. यासह त्यांना देण्यात येणारे वेतन आणि भत्ते काढून घेतले पाहिजेत !

गेल्या ५ वर्षांत राज्यसभेतील कामकाजाचा ५७ टक्के वेळ वाया ! – सभापती व्यंकय्या नायडू यांची खंत

संसदेच्या प्रत्येक अधिवेशानात वेळ वाया जाण्याचा कालावधी मोठा असतो; मात्र यासाठी उत्तरदायींकडून दंड वसूल केला जात नाही कि कठोर कारवाई केली जात नाही. त्यामुळे या स्थितीत काहीच पालट होत नाही.

नवीन संसद भवनाच्या छातावर बसवण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे पंतप्रधान मोदी यांच्याकडून अनावरण

राष्ट्रीय प्रतीक असणार्‍या या अशोक स्तंभाचे वजन ९ सहस्र ५०० किलो इतके आहे. साडेसहा मीटर उंच असणारा हा स्तंभ कास्य धातुपासून बनवण्यात आला आहे. हा स्तंभ बसवण्यासाठी ६ सहस्र ५०० किलो वजनाचा स्टीलचा चबुतरा बनवण्यात आला आहे.

गलेलठ्ठ वेतन मिळत असतांनाही प्रवासभत्त्याचा घोटाळा करणारे खासदार !

‘आपल्या देशातील विद्यमान संसदेत ४३ टक्के खासदारांवर गुन्हे नोंद आहेत’, असे आपण वाचतो; मात्र या खासदारांना इतक्या सोयी-सुविधा, तसेच वेतन-भत्ते मिळत असतांनाही आपल्या देशातील संसदेत ‘प्रवासभत्ता घोटाळा’ झाल्याचे उघडकीस आले.

देशातील बहुतांश विधानसभांच्या कामकाजाचा कालावधी वर्षाकाठी ३० दिवसांहून अल्प !

लोकसभेचे कामकाज वर्षाकाठी सरासरी ६३ दिवस, तर अमेरिका, इंग्लंड आणि जपान येथील संसदांचे कामकाज भारताच्या तुलनेत अडीच पटींहून अधिक दिवस चालते !

तरुणींचे विवाहाचे वय १८ वरून २१ करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रीमंडळाची संमती

केंद्रीय मंत्रीमंडळाने तरुण आणि तरुणी यांच्यासाठी विवाहाचे किमान वय एकसमान म्हणजेच २१ वर्षे करण्यास संमती दिली आहे. यासमवेतच निवडणूक सुधारणांशी संबंधित विधेयकही संमत करण्यात आले आहे.