संसदेचे अधिवेशन अनिश्‍चित काळासाठी स्थगित

गोंधळामुळे लोकसभेचा १८ घंटे ४८ मिनिटांचा वेळ वाया

वाया गेलेल्या वेळेचा खर्च गोंधळ घालणार्‍या सदस्यांकडून वसूल करा ! – संपादक 

नवी देहली – संसदेचे हिवाळी अधिवेशन एक दिवस आधीच अनिश्‍चित काळासाठी स्थगित करण्यात आले. गेल्या काही दिवसांत अधिवेशनात गोंधळच अधिक घातल्याने लोकसभेचे १८ घंटे ४८ मिनिटांच्या कामकाजाचा वेळ वाया गेला.

कोट्यवधी रुपयांचा चुराडा !

१. एका निष्कर्षानुसार संसदेच्या एका मिनिटासाठी २९ सहस्र रुपये ते १ लाख ८३ सहस्र रुपय खर्च येतो.
२. एका घंट्यासाठी साधारण १७ लाख ४० सहस्र ते १ कोटी १० लाख रुपये खर्च येतो.
३. एका दिवसात १ कोटी ९१ लाख ते १२ कोटी रुपये खर्च येतो.
(वर्ष २०१९)