नवीन संसद भवनाच्या छातावर बसवण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे पंतप्रधान मोदी यांच्याकडून अनावरण

भव्य अशोक स्तंभाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले

नवी देहली – येथे नव्याने बांधण्यात येणार्‍या संसद भवनाच्या इमारतीच्या छतावर बसवण्यात आलेल्या भव्य अशोक स्तंभाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हेही उपस्थित होते. राष्ट्रीय प्रतीक असणार्‍या या अशोक स्तंभाचे वजन ९ सहस्र ५०० किलो इतके आहे. साडेसहा मीटर उंच असणारा हा स्तंभ कास्य धातुपासून बनवण्यात आला आहे. हा स्तंभ बसवण्यासाठी ६ सहस्र ५०० किलो वजनाचा स्टीलचा चबुतरा बनवण्यात आला आहे.

संसद भवनाच्या इमारतीच्या छतावर बसवण्यात आलेला भव्य अशोक स्तंभ (चित्रावर क्लिक करा)

या अनावरणाविषयी एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन औवेसी यांनी टीका केली आहे.

ते म्हणाले की, घटनेनुसार लोकसभेचे अध्यक्ष प्रमुख असल्याने पंतप्रधानांऐवजी त्यांच्या हस्ते अनावरण होणे आवश्यक होते.