चुकीचे वर्णन करून मतपेटीचे राजकारण करणे ब्रिटीश खासदारांनी टाळावे ! – भारताने ब्रिटनच्या उच्चायुक्तांना सुनावले

ब्रिटिशांना भारतातून हाकलले; मात्र भारतावर अधिकार गाजवण्याची खुमखुमी त्यांच्यात अजूनही दिसून येते. ब्रिटनला समजेल, अशा भाषेत भारताने प्रत्युत्तर दिले पाहिजे !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही अमरावती जिल्ह्यातील २४ गावांत वीजच नाही ! – खासदार नवनीत राणा

संसदेचे चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात येथील खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने मी विनंती करते की, केंद्र शासनाने या गावांना वीज जोडणी देण्यासाठी ‘विशेष योजना’ आखून त्यासंबधीचे आदेश द्यावेत..

१ फेब्रुवारी या दिवशी संसदेवर काढण्यात येणारा शेतकरी मोर्चा रहित !

१ फेब्रुवारी या दिवशी संसदेवर काढण्यात येणारा शेतकर्‍यांचा मोर्चा रहित करण्यात आला आहे. देहलीत झालेल्या हिंसाचारानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधीपूर्वी अमेरिकेत सशस्त्र आंदोलनाची शक्यता ! – एफ्.बी.आय.ची चेतावणी

जगातील सर्वांत जुन्या समजल्या जाणार्‍या लोकशाही देशातील ही स्थिती भयावह आहे. यातून अन्य लोकशाहीप्रधान देशांनी बोध घेऊन सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे !

संसदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाला सर्वोच्च न्यायालयाची अनुमती

सर्वोच्च न्यायालयाने नव्या संसदेच्या आणि अन्य इमारतींच्या प्रकल्पाला संमती दिली आहे. केंद्र सरकारकडे बांधकामासंबंधीची सर्व कागदपत्रे योग्य असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला.

अमेरिकेकडून पंतप्रधान मोदी ‘लीजन ऑफ मेरिट’ पुरस्काराने सन्मानित

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा सर्वोच्च मिलिट्री सन्मान ‘लीजन ऑफ मेरिट’ने सन्मानित केले. हा पुरस्कार भारत आणि अमेरिका यांच्यातील रणनीतीक संबंध वाढवण्यासाठी देण्यात आला.

नेपाळचे पंतप्रधान ओली यांचे सरकार विसर्जित

नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत अचानकपणे संसद विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मंत्रीमंडळाची ही शिफारस राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांच्याकडे पाठवण्यात आली.

कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर संसदेचे हिवाळी अधिवेशन रहित ! – केंद्र सरकारचा निर्णय

संसदेचे कुठलेही अधिवेशन असले, तरी ते शांततेत पार पडते, असा इतिहास नाही. जनतेचे कोट्यवधी रुपये खर्च करून चालवण्यात येणार्‍या अधिवेशनात जर गदारोळच करण्यासाठी लोकप्रतिनिधी येणार असतील, तर त्याचा जनतेला काय उपयोग ?

नव्या संसद भवनाच्या बांधकामाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

येत्या १० डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार्‍या नव्या संसद भवनाच्या बांधकामालाच सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे; मात्र भूमीपूजन करण्यास कोणतीही अडचण नाही, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.