राहुल गांधी यांची खासदारकी रहित !

वर्ष २०१९ मध्ये कर्नाटक येथे झालेल्या एका प्रचारसभेत गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे?’ असा प्रश्‍न उपस्थित केला होता.

‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग’ असणारे विधेयक अमेरिकेच्या संसदेत संमत

अमेरिकेने तिच्या संसदेत एक विधेयक संमत करून ‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे’, असे म्हटले आहे. भारतातील अरुणाचल प्रदेश आणि चीन यांच्यामधील मॅकमोहन रेषेला आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून अमेरिकेने या विधेयकाद्वारे मान्यता दिली आहे.

लंडनमधील राहुल गांधी यांच्या विधानावरून संसदेत गदारोळ !

संसदेचे कामकाज गदारोळ न होता झाले, असा एकतरी दिवस गेला आहे का ? याला उत्तरदायी असणार्‍यांना ज्या प्रमाणे शाळेत वर्गातून बाहेर काढले जाते, तसे बाहेर का काढले जात नाही ?

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटींचे पालन करण्यासाठी पाककडून संसदेत विधेयक संमत

दिवाळखोर होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असणार्‍या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटी मान्य करण्यासाठी संसदेत एक विधेयक संमत केले आहे. नाणेनिधीच्या अटींचे पालन केले, तर पाकला सुमारे ९ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज मिळणार आहे.

प्लास्टिक बाटल्यांचा पुनर्वापर करून बनवलेला जॅकेट घालून पंतप्रधान मोदी पोचले संसदेत !

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ८ फेब्रुवारी या दिवशी संसदेत फिकट निळ्या रंगाचे जॅकेट परिधान करून आले होते. हे जॅकेट कापडाचे नसून पुनर्वापर करण्यात आलेल्या प्लास्टिकच्या बाटलीपासून बनवण्यात आले आहे.

हिंडेनबर्गच्या अहवालावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित

लाखो रुपये व्यय (खर्च) करून चालवण्यात येणारे संसदेचे कामकाज अशा प्रकारे गदारोळ करून बंद पाडणार्‍यांकडून हा पैसा वसूल करण्याची आणि अशांची खासदारकी रहित करण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे !

तिजोरीची छिद्रे बंद करा !

योजनांवरील निधी जोपर्यंत भ्रष्‍टाचार्‍यांच्‍या खिशात जात आहे, तोपर्यंत अर्थसंकल्‍पाचा उद्देश पूर्ण कसा होणार ?

वेगवान विकास आणि दूरगामी दृष्टी ठेवून घेतलेले निर्णय, ही देशाची ओळख ! – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

देशात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण होऊ लागल्या आहेत. आज भारताच्या ‘डिजिटल नेटवर्क’(विकासासाठी आधुनिक माध्यमांचा वापर) मधून विकसित देशही प्रेरणा घेत आहेत. देशाला भ्रष्टाचारापासून स्वातंत्र्य मिळत आहे.

न्यायपालिका आणि विधीपालिका यांच्यातील अहंकाराचे लढे ?

‘न्यायदेवते, तुला पुन्हा पत्र लिहितो आहे. पुन्हा पुन्हा लिहितो आहे. ते पाहून तू रागावणार नाहीस, अशी आशा मी ठेवली, तरी पत्र वाचून काही करणारही नाहीस, असे मात्र मला वाटू देऊ नकोस; कारण विषय तसा गंभीर आहे आणि म्हटले तर तसा विनोदीही ! कुणीतरी आधी म्हणून गेले होते की, इतिहासाची पुनरावृत्ती होते. आधी ती शोकांतिका असते, मग तो विनोद असतो.

ब्राझिलमध्‍ये लोकशाही संपेल ?

समाजाचा मानसिक, बौद्धिक आणि आध्‍यात्मिक स्‍तर उंचावण्‍यासाठी व्‍यवस्‍थेपासून समाजधुरिणांपर्यंत सर्वांनी झटावे लागते. ब्राझिलमधील हिंसाचारावरून ‘सामाजिक भान’, ‘लोकशाहीवरील आघात’ यांवर चर्चा करणार्‍यांनी सामाजिक सुसंपन्‍नतेसाठी उपाययोजना काढल्‍यास जगाचे भले होईल !