राज्यसभेत गदारोळ घालणार्‍या १९ खासदारांचे एका आठड्यासाठी निलंबन !

नवी देहली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत घोषणाबाजी केल्याच्या प्रकरणी १९ खासदारांना एक आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले. यापूर्वीच लोकसभेच्या ४ खासदरांना निलंबित करण्यात आले होते. अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर (जीएस्टी), महागाई आदी सूत्रांवर विरोधकांनी गदारोळ घातला. विरोधी पक्ष कामकाजात अडथळा आणत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे, तर सरकार या प्रश्‍नांवर चर्चा करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. हे अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

संपादकीय भूमिका

केवळ निलंबन नको, तर त्यांच्याकडून अधिवेशनासाठीचा वेळ वाया घालवण्यावरून दंड वसूल केला पाहिजे. यासह त्यांना देण्यात येणारे वेतन आणि भत्ते काढून घेतले पाहिजेत !