राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून हॉटेल ट्रायडेंटमधील ‘सी.सी.टी.व्ही.’ची तपासणी

या प्रकरणी अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे १६ ते २० फेब्रुवारी या कालावधीत हॉटेल ट्रायडेंटमध्ये राहिले होते. तेथे त्यांनी बनावट आधारकार्ड दाखवले असल्याचा दावा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून करण्यात आला आहे.

‘एन्आयए’ला आणण्याची घाई करायला नको होती ! – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत

एन्आयएकडे अन्वेषण गेल्याने राज्य सरकारला धक्का वगैरे बसलेला नाही. त्यांना जे अन्वेषण करायचे, ते करू दे. कुणीही आले आणि कोणत्याही पद्धतीने अन्वेषण केले, तरी सत्य बाहेर येईलच. ‘महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत’, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र पोलीस दलावरील अविश्‍वास चुकीचा ! – शंभूराज देसाई

पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाचा तपास आम्ही ए.टी.एस्. कडे सोपवला होता; मात्र अचानक एन्.आय.ए. ने तपासात उडी घेत राज्यशासनावर अविश्‍वास दाखवला आहे.

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’कडून अटक

अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ वाहन उभे करण्यात वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप एन्.आय.ए.ने केला आहे. याच आरोपाखाली वाझे यांना अटक करण्यात आली असून त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

…तर राज्यातील सरकार कोसळेल ! – अभिनेत्री कंगना राणावत 

येथील पोलीस दलातील साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एन्.आय.ए.ने अटक केली. या अटकेनंतर राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणावरून अभिनेत्री कंगना राणावत हिने महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

‘जैश-उल-हिंद’च्या नावाने टेलीग्रामवरून आलेला स्फोटके ठेवल्याचे दायित्व घेणारा संदेश तिहार कारागृहातून !

मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया निवास्थानाच्या बाहेर स्फोटके ठेवल्याचे दायित्व घेतल्याचा संदेश तिहार कारागृहातून आल्याचे समोर आले.

नवी देहलीत झालेल्या इस्रायली दूतावासाजवळील बॉम्बस्फोटामागे इराणचा हात !

कालपर्यंत पाकसाठी देशद्रोही कारवाया करणारे आता इराणसाठीही देशद्रोही कारवाया करत आहेत ! पाकसमवेत आता इराणही भारतात सहजरित्या आतंकवादी कारवाया करू शकतो, हे भारताच्या गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षायंत्रणा यांना लज्जास्पद !

नजरकैद आणि जामीन यांमागील वस्तूस्थिती !

जानेवारी २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शहरी नक्षली आरोपींना नजरकैद दिल्यानंतर गदारोळ झाला होता, तो योग्यच होता. हेच सर्वोच्च न्यायालयाचा आंध्रप्रदेश सरकारविरुद्धच्या खटल्याचा निवाडा आणि मुंबई उच्च न्यायालय यांचा निवाडा यांवरून सिद्ध होते. नजरकैद ही फौजदारी निगराणी संहितेतील व्याख्येत कुठेही बसत नाही.

शेतकरी आंदोलनातील नेते बलदेव सिंह सिरसा यांची एन्.आय.ए.कडून चौकशी होणार

एन्.आय.ए.ने खलिस्तानी आतंकवादी संघटना आणि त्यांच्याकडून सामाजिक संघटनांना होणारा अर्थपुरवठा यांची सूची बनवली आहे. या सामाजिक संघटना विदेशातून मिळालेला पैसा देशविरोधी कारवायांसाठी व्यय (खर्च) करत असल्याची माहिती मिळाली आहे.  

वर्ष २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट कटाच्या बैठकीला उपस्थित राहून मी माझे कर्तव्य बजावत होतो ! – ले. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित

‘कर्तव्य म्हणून बैठकीला उपस्थित राहिल्यानंतरही मला कारागृहात टाकले गेले आणि आतंकवादी असल्याचा ठपका ठेवून छळवणूक करण्यात आली’ – ले. कर्नल पुरोहित