राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून हॉटेल ट्रायडेंटमधील ‘सी.सी.टी.व्ही.’ची तपासणी

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर जिलेटिन सापडल्याचे प्रकरण

मुकेश अंबानी यांच्या इमारतीबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवलेली जीप (मध्यभागी)

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर जिलेटिन सापडल्याच्या प्रकरणाच्या अन्वेषणाच्या अंतर्गत २२ मार्च या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून हॉटेल ट्रायडेंटमधील सी.सी.टी.व्ही. फुटेजची पडताळणी करण्यात आली. या प्रकरणी अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे १६ ते २० फेब्रुवारी या कालावधीत हॉटेल ट्रायडेंटमध्ये राहिले होते. तेथे त्यांनी बनावट आधारकार्ड दाखवले असल्याचा दावा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून करण्यात आला आहे.