मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे १४ एप्रिल या दिवशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून अन्वेषण करण्यात येणार आहे. देशमुख यांना अन्वेषणासाठी समन्स दिले आहे. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविषयी आरोप केले. याविषयी अधिवक्त्या जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका करून अनिल देशमुख यांची केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अन्वेषण करण्याची मागणी केली होते. यावर न्यायालयाने १५ दिवसांत अनिल देशमुख यांचे प्राथमिक अन्वेषण करण्याचा आदेश दिला आहे.