कोरोनाच्या काळात गंगानदीमध्ये किती मृतदेह पुरले किंवा आढळले ?, याची माहिती द्या !

राष्ट्रीय हरित लवादाचा उत्तरप्रदेश आणि बिहार सरकार यांना आदेश

नवी देहली – राष्ट्रीय हरित लावादाने यावर्षी ३१ मार्चपर्यंत कोरोनाच्या काळात गंगानदीमध्ये तरंगणारे आणि नदीच्या काठावर पुरण्यात आलेल्या मानवी मृतदेहांच्या संख्येविषयी उत्तरप्रदेश आणि बिहार या दोन्ही राज्य सरकारांकडून माहिती मागवली आहे. लवादाने अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), तसेच दोही राज्यांचे मुख्य सचिव (आरोग्य) यांना या विषयावर तथ्यात्मक पडताळणी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तसेच दोन्ही सरकारांनी ‘किती प्रकरणांमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार किंवा पुरण्यासाठी कुटुंबियांना आर्थिक साहाय्य केले ?’ याचीही विचारणा करण्यात आली होती.

‘गंगानदीत मृतदेह वाहून जाणे किंवा नदीच्या काठावर मृतदेह पुरण्यासारख्या गोष्टी थांबवण्यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी कोणती पावले उचलली गेली आहेत का ?’ याविषयीही माहिती मागवण्यात आली आहे.