राष्ट्रीय हरित लवादाने सरकारी यंत्रणांना फटकारले !
नवी देहली – यमुना नदीची स्वच्छता समाधानकारक स्थितीपासून पुष्कळ दूर आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय हरित लवादाने देहली जल बोर्ड, देहली सरकार आणि अन्य सरकारी यंत्रण यांना फटकारले. या यंत्रणांनी यमुना नदीच्या स्वच्छतेच्या संदर्भातील एक अहवाल लवादाला सादर केला होता. यात नदीमध्ये सोडण्यात येणार्या नाल्यांच्या पाण्याची, तसेच या पाण्यांतील कचरा शोधण्याच्या यंत्रणांविषयी माहिती देण्यात आली होती.
१. लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांनी म्हटले की, या अहवालामध्ये अनेक त्रुटी आहेत. यात प्रक्रिया करून अशुद्ध पाण्याचे केलेले शुद्धीकरण, त्याची गुणवत्ता यांच्या माहितीत त्रुटी आहेत.
२. लवादाने या वेळी अहवालामध्ये देण्यात आलेली माहिती आणि आकडेवारी यांची सत्यता पडताळण्याचा निर्देश दिला आहे. यावर पुढील सुनावणी ७ डिसेंबर या दिवशी होणार आहे.
संपादकीय भूमिकासरकारी यंत्रणांना शाब्दिकरित्या फटकारून काहीच उपयोग नाही; कारण त्यांची कातडी गेंड्याची झाली आहे ! त्यामुळे अशांना कठोर शिक्षा करणेच आवश्यक आहे ! |