कुख्यात गुंड आतिक अहमद याला पोलिसांनी गुजरातमधून प्रयागराजमध्ये आणले !

उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड आतिक अहमद हा गुजरातच्या साबरमती कारागृहात अटकेत होता. त्याला अधिवक्ता उमेश पाल यांच्या हत्येच्या प्रकरणी कह्यात घेऊन उत्तरप्रदेश पोलिसांकडून प्रयागराज येथे आणण्यात आले.

आगरा येथे पोपटाने दिलेल्या सूचनेवरून पोलीस खुन्यांपर्यंत पोचले !

या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या घरातील पोपटाच्या साक्षीवरून मारेकर्‍यांचा माग काढला होता. या हत्येतील एक दोषी महिलेचा नातेवाईक होता.

ग्रँटरोड (मुंबई) येथे ५ जणांवर चाकूंचे आक्रमण

ग्रँटरोड येथील एका इमारतीतील चेतन गाला या व्यापार्‍याने त्याच्या शेजारच्या घरातील ५ जणांवर चाकूने आक्रमण केले आहे. यात दोघांचा मृत्यू झाला. एक वयस्कर होते, तर एक महिला आहे.

जत (जिल्हा सांगली) येथील भाजप नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून हत्या !

दिवसाढवळ्या हत्या होणे पोलिसांना लज्जास्पद !

पाकिस्तानमध्ये आतंकवादी आक्रमणांत मरणार्‍यांची संख्येत लक्षणीय वाढ !

पाकिस्तानमध्ये वर्ष २०२२ मध्ये आतंकवादी आक्रमणांत मरणार्‍यांची संख्या अफगाणिस्तानपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. वर्ष २०२२ मध्ये अशा घटनांत एकूण ६४३ लोकांचा मृत्यू झाला. वर्ष २०२१ मध्ये ही संख्या २९२ होती.

पशूवैद्यकीय डॉ. युसुफ खान हाच हत्याकांडाचा सूत्रधार !  – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा

उमेश कोल्हे हत्या प्रकरण

मध्‍यप्रदेशात सामूहिक बलात्‍कार आणि हत्‍येच्‍या घटनेनंतर आदिवासींचे पोलीस ठाण्‍यावर आक्रमण

मध्‍यप्रदेशातील महूमध्‍ये आदिवासी मुलीवर सामूहिक बलात्‍कार करून तिची हत्‍या केल्‍याच्‍या घटनेनंतर आदिवासींनी पोलीस ठाण्‍यावर आक्रमण केले. या वेळी झालेल्‍या दगडफेकीत अनेक जण घायाळ झाले. बचावासाठी पोलिसांनी गोळीबार केला आणि अश्रुधुराच्‍या नळकांड्या फोडल्‍या.

कृष्णा नदीच्या काठावर लाखो माशांच्या मृत्यू प्रकरणी ‘दत्त इंडिया साखर कारखान्या’ला नोटीस !

रसायनमिश्रीत मळीचे दूषित पाणी सोडल्याने कृष्णा नदीच्या पाण्याला दुर्गंधी सुटली असून शिरोली तालुक्यातील, तसेच अंकली परिसरातील गावांना प्रदूषित पाणी प्यावे लागल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

साधना आणि क्षात्रधर्म यांचे समन्वयक गुरु गोविंदसिंह !

शिखांनाही त्यांचे गुरु आणि ज्ञान परंपरा यांवर योग्य पकड ठेवावी लागेल, अन्यथा शीख गुरूंचा बळी घेणारा साम्राज्यवादी हिंसक मतवाद आजही त्याच रांगेत आहे आणि भारतासमवेत जगभरात पसरत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून ‘लव्ह जिहाद’च्या हिंदुविरोधी षड्यंत्राला ‘आंतरधर्मीय विवाह’ ठरवण्याचा प्रयत्न !

सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे जितेंद्र आव्हाड निरुत्तर ! अजित पवार यांनी वादविवाद थांबवण्याचे आवाहन केले.