हमासचा आतंकवादी त्याच्या वडिलांना भ्रमणभाषवरून माहिती देतांनाचा ऑडिओ इस्रायलकडून प्रसारित !

तेल अविव (इस्रायल) – इस्रायल आणि हमास यांच्यात चालू असलेल्या घडामोडींची माहिती इस्रायली सैन्य आणि संरक्षण मंत्रालय त्यांच्या विविध ‘एक्स’ खात्यांवरून सातत्याने प्रसारित करत आहेत. त्यांनी हमासच्या एका आतंकवाद्याचे त्याच्या वडिलांशी झालेले ऑडिओ संभाषण प्रसारित केले आहे. त्यात महमूद नावाचा आतंकवादी त्याच्या वडिलांना सांगत आहे की, त्याने १० ज्यू लोकांची हत्या केली आहे.
इस्रायली संरक्षण मंत्रालयाने म्हटले की, महमूदने ७ ऑक्टोबर या दिवशी १० ज्यू लोकांची हत्या करून त्याची माहिती त्याने त्याच दिवशी त्याच्या वडिलांना दिली. यासाठी त्याने मारलेल्या एका ज्यू महिलेचाच भ्रमणभाष वापरल्याचेही इस्रायलने म्हटले आहे. या वेळी महमूदचे वडील त्याला म्हणतात, ‘अल्लाहू अकबर (अल्ला महान आहे). खुदा तुझे रक्षण करो ! अल्ला तुला सुरक्षितपणे घरी पोचवेल, याची खात्री वाटते !’ या वेळी महमूदची आईही त्याचे कौतुक करत असल्याचे ऑडिओत एकायला मिळत आहे.
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
Resolution Over Iran War : इराणविरुद्धची सैनिकी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ संभागृहात संमत