
गडचिरोली – प्रेमविवाहामुळे वडिलांनी आत्महत्या केल्याने सासरच्यांवर सूड घेण्यासाठी, तसेच मालमत्तेतील वाटेकरी संपवण्यासाठी कुटुंबातील सुनेने मामेसासूच्या साहाय्याने कुंभारे परिवारातील ६ जणांची २२ दिवसांत टप्प्याटप्प्याने हत्या केली. नियोजनबद्धरित्या या दोघींनी धातूमिश्रीत विषप्रयोग करून हे हत्याकांड घडवले. या दोघींना पोलिसांनी अटक केली आहे. संघमित्रा कुंभारे (सून) आणि रोजा रामटेके (मामेसासू) अशी अटकेतील महिलांची नावे आहेत.
मृतांमध्ये शंकर कुंभारे, त्यांच्या पत्नी विजया कुंभारे, मुलगा रोशन, शंकर कुंभारे यांची विवाहित मुलगी कोमल दहागावकर विजया यांची बहीण आनंदा उराडे आणि कुंभारे कुटुंबियांना रुग्णालयात नेणारा खासगी वाहनचालक राकेश मडावी यांचा समावेश आहे. मृतांसमवेत राहूनही त्या दोघी ठणठणीत असल्याने पोलिसांचा त्यांच्यावर संशय बळावला.
संपादकीय भूमिका :मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करणार्यांना आजन्म कारागृहात डांबण्याचीच शिक्षा मिळायला हवी ! |
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात !