वर्ष २०१८ च्या तुलनेत वर्ष २०१९ मध्ये दंगली, हत्या, बलात्कार आदींच्या घटनांत अल्प प्रमाणात घट ! – केंद्र सरकारचा दावा

देशातील गुन्हेगारीत अल्प प्रमाणात घट होण्याऐवजी ते पूर्णपणे रोखणे हेच लक्ष्य असले पाहिजे, तरच समाज सुरक्षित आणि शांततेत जगू शकेल !

मुंबई आतंकवादविरोधी पथकाकडून मनसुख हिरेन यांच्या हत्येचा गुन्हा नोंद

वसायिक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ कायम असतांनाच राज्याच्या गृह विभागाच्या आदेशानुसार ठाणे शहर पोलिसांनाकडून मनसुख हिरेन यांच्या अकस्मात् मृत्यू प्रकरणाचे अन्वेषण मुंबई आतंकवादविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आले.

देशभरात होणार्‍या हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी पुणे, नगर, जालना येथे निवेदन देण्यात आले !

गेल्या काही वर्षांत देशभरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणे, त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करणे, तसेच त्यांना वेचून, पाळत ठेवून ठार मारणे अशा घटनात लक्षणीय वाढ झाली आहे.

अंबाजी, फातोर्डा, मडगाव येथे दुहेरी हत्याकांड : २ वृद्धांची हत्या

अंबाजी, फातोर्डा येथे दुहेरी हत्याकांडाची घटना उघडकीस आली आहे. या हत्याकांडाच्या घटनेने मडगाव येथे खळबळ माजली आहे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाने वडिलांसह आजोबांचा खून करून आत्महत्या केली

मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाने वडिलांसह आजोबांचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याची घटना मुलुंडमध्ये घडली आहे. मुलुंड पश्‍चिमेकडील वसंत ऑस्कर सोसायटीत ही घटना घडली.

भारतीय मालिकांचे स्थानिक भाषांमध्ये भाषांतर करणार्‍या तिघा अफगाणी महिलांची इस्लामिक स्टेटकडून हत्या

या तिघी महिला तुर्कस्तान आणि भारत येथील नाटक अन् मालिका यांचे स्थानिक भाषा ‘दारी’ अन् ‘पश्तू’ यांमध्ये भाषांतर करत होत्या.

मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा त्यांचे भाऊ विनोद यांचा दावा !

काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. त्याचे मालक मनसुख हिरेन यांचा ५ मार्च या दिवशी संशयास्पद मृत्यू झाला. हिरेन यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

फाशीची चिंता नाही ?

चोर-दरोडेखोरांना ठाऊक असते की, ‘फार काय करतील, २-४ वर्षे आत रहावे लागेल इतकेच !’ आणि आता तर बलात्कारी अन् खुनी यांनाही कळून चुकले आहे की, ‘फाशी वगैरे काही लगेच होत नसते !’ ज्याचा धाक असायला हवा, त्यातीलच हवा निघून गेली आहे ! सगळ्यांना मोकळे रान मिळाले आहे, असेच तर यातून दिसून येत नाही ना ?

मुख्य आरोपी बाळ बोठे पसार घोषित

रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला पसार घोषित करण्याच्या मागणीचा अर्ज पारनेर न्यायालयाने संमत केला आहे.

उत्तरप्रदेशातील सीमेवर नेपाळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १ भारतीय ठार  

चीन आणि पाक यांच्याप्रमाणे नेपाळच्या कुरापतीही गेल्या काही मासांपासून चालू झाल्या आहेत, याकडे भारताने तितक्याच गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे !