युवकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी ६ संशयितांना अटकेत ! 

प्रतीकात्मक छायाचित्र

नाशिक – येथील सागर शिंदे या युवकाची १२ जणांच्या टोळक्याने निर्घृण हत्या केली. या प्रकरणी ६ संशयितांना अटक करण्यात आली असून ४ जण फरार आहेत. या खुनाच्या घटनेत संशयितांनी वापर केलेला कोयता, चॉपर, दोन स्टील रॉड आणि दोन जिवंत काडतुसांसह दोन पिस्तूल पोलिसांनी हस्तगत केले आहेत.